अश्विन महत्त्वाचा खेळाडू : गांगुली

By Admin | Published: July 9, 2016 03:26 AM2016-07-09T03:26:28+5:302016-07-09T03:26:28+5:30

आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विन वेस्ट इंडिज दौऱ्यात भारताच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले. अश्विन मुख्य प्रशिक्षक

Ashwin important player: Ganguly | अश्विन महत्त्वाचा खेळाडू : गांगुली

अश्विन महत्त्वाचा खेळाडू : गांगुली

googlenewsNext

कोलकाता : आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विन वेस्ट इंडिज दौऱ्यात भारताच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले. अश्विन मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली मालिका खेळणार आहे.
गांगुली शुक्रवारी ४४ वर्षांचा झाला. आपल्या निवासस्थानी पत्रकारांसोबत बोलताना गांगुली म्हणाला, ‘माझ्या मते अश्विन विंडीजमध्ये हुकमी एक्का ठरेल.’
विंडीजने अलीकडेच टी-२० स्पर्धेत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदाचा मान मिळवला. विंडीज संघ वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेत उपविजेता ठरला. आॅस्ट्रेलियाने जेतेपद पटकावले. या मालिकेत सहभागी झालेला तिसरा संघ दक्षिण आफ्रिका होता.
विंडीज क्रिकेटसाठी यंदाचे वर्ष संस्मरणीय ठरले. त्यांच्या महिला संघाने टी-२० विश्वविजेतेपद पटकावले, तर अंडर-१९ संघाने विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.

‘दादा’चा ४४ वा वाढदिवस साजरा
भारताच्या महान क्रिकेटपटूंमध्ये स्थान असलेला माजी कर्णधार सौरभ गांगुली अर्थात ‘दादा’ने शुक्रवारी आपला ४४ वा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियात त्याच्यावर वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा वर्षांव झाला आहे.
महेंद्रसिंग धोनी याचा कालच ३५ वा वाढदिवस साजरा झाला. माहीने आपल्या लाडक्या दादाला ‘हॅप्पी बर्थ डे दादा’अशा टिष्ट्वटरवर शुभेच्छा दिल्या. भारताचे मुख्य कोच आणि माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी टिष्ट्वटरवर लिहिले,‘हॅप्पी बर्थ डे सौरभ. परमेश्वर तुला अनेकानेक आनंद आणि आशीर्वाद देवो.’ माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवाग म्हणाला, ‘हॅप्पी बर्थ डे दादा! भारताचा गौरव असाच वाढवित राहा. लॉर्डस्वर तू शर्ट हवेत फडकविला होता.’ युवराज म्हणाला, ‘क्रिकेटमधील सर्वांत मोठ्या दादाला शुभेच्छा. दादाने सेहवागला सलामीला जाण्याची संधी दिली आणि पुढचा सर्व इतिहास अनेकांना ठाऊक आहे.’ बीसीसीआयने टिष्ट्वटर हॅन्डलवर लिहिले, ‘सौरभ गांगुली याला वाढदिवसाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा.’

Web Title: Ashwin important player: Ganguly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.