‘आश्विन सर्वात मौल्यवान’
By admin | Published: January 19, 2017 12:50 AM2017-01-19T00:50:51+5:302017-01-19T00:50:51+5:30
आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विन हा जगातील सर्वात मौल्यवान खेळाडूंपैकी एक आहे
चेन्नई : आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विन हा जगातील सर्वात मौल्यवान खेळाडूंपैकी एक आहे. तो गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही उपयुक्त असून सहाव्या स्थानावर खेळायला आला तरी शतक ठोकू शकतो, असे मत प्रतिष्ठित कोच डेव्ह व्हॉटमोर यांनी नोंदविले आहे.
भारत दौरा आॅस्ट्रेलियासाठी सोपा नसणार, असे संकेत देत व्हाटमोर म्हणाले, ‘भारताकडे आश्विन भारताकडे असल्याने आॅसीला अवघड आव्हानांचा सामना करावा लागेल.’
श्रीलंकेला १९९६ चा विश्वचषक जिंकून देणारे व्हाटमोर पुढे म्हणाले,‘ आॅस्ट्रेलियाकडे त्यांचा सर्वोत्कृष्ट टी-२० संघ आहे. पण भारतात त्यांची परीक्षा असेल. भारताकडे बराच अनुभव असून नवा कर्णधार आहे आणि संघात जोश आहे. आॅस्ट्रेलियाला या दौऱ्यात विजय नोंदविणे कठीण जाईल. आश्विन फारच भेदक मारा करतो.’ (वृत्तसंस्था)