आश्विनने केला अर्धा तास सराव

By admin | Published: November 1, 2015 02:52 AM2015-11-01T02:52:34+5:302015-11-01T02:52:34+5:30

द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी सज्ज होत असलेला आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन याने आज शनिवारी ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये सीमारेषेबाहेर सराव केला. येथे सुरू असलेल्या बोर्ड

Ashwin practiced for half an hour | आश्विनने केला अर्धा तास सराव

आश्विनने केला अर्धा तास सराव

Next

मुंबई : द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी सज्ज होत असलेला आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन याने आज शनिवारी ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये सीमारेषेबाहेर सराव केला. येथे सुरू असलेल्या बोर्ड अध्यक्ष एकादश-द. आफ्रिका सराव सामन्यादरम्यान आश्विन अचानक दाखल झाला.
उपहारापूर्वी द. आफ्रिकेचा वन-डे कर्णधार एबी डिव्हिलियर्स फलंदाजी करीत असताना आश्विन मात्र सीसीआय क्लब हाऊसशेजारी फिजियो पॅट्रिक फरहार्ट यांच्या मार्गदर्शनात सराव करीत होता. या दरम्यान तो थोडावेळ धावला नंतर चेंडू टाकताना देखील दिसला. अर्धा तास त्याने व्यायाम केला. यानंतर त्याने स्टेडियम सोडले. ५ नोव्हेंबरपासून मोहालीत सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीसाठी आश्विन भारतीय संघात दाखल होणार आहे. द. आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेतील पहिल्याच सामन्यात क्षेत्ररक्षण करतेवेळी जखम झाल्याने आश्विन पुढे एकही सामना खेळू शकला नव्हता.
भारताने ही मालिका २-३ ने गमावली. निवडकर्त्यांनी त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात स्थान दिले आहे. दोन दिवसांआधी आश्विनने चेन्नईत
शंभर टक्के फिट असल्याचे सांगितले होते.(वृत्तसंस्था)

Web Title: Ashwin practiced for half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.