अश्विनने लंकेची केली दैना, भारताचा श्रीलंकेवर ९ गड्यानी विजय

By admin | Published: February 14, 2016 09:56 PM2016-02-14T21:56:39+5:302016-02-14T21:56:39+5:30

श्रीलंकेने दिलेले मोजक्या ८३ धावांचे आव्हान भारताने १ गड्यांच्या मोबदल्यात पार करत श्रालंकेवर ९ गड्यानी विजय मिळवला

Ashwin, Sri Lanka's 9-wicket win over Sri Lanka | अश्विनने लंकेची केली दैना, भारताचा श्रीलंकेवर ९ गड्यानी विजय

अश्विनने लंकेची केली दैना, भारताचा श्रीलंकेवर ९ गड्यानी विजय

Next
>ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. १४ : आर अश्विनच्या भेदक फिरकी गोलंदाजीच्या बळावर भारताने श्रीलंकेला ८२ धावांच्या निचांकी धावसंखेवर रोखले. या सामन्याचा हिरो अश्विनने आपल्या ४ षटकाच्या गोलंदाजीत ८ धावा देत ४ फलंदाजाला बाद केले. श्रीलंकेने दिलेले मोजक्या ८३ धावांचे आव्हान भारताने १ गड्यांच्या मोबदल्यात पार करत श्रालंकेवर ९ गड्यानी विजय मिळवला. भारताने आपल्या फलंदाजीची सुरवात अतिशय सावधानतेने केली. भारताने पहिल्या ७.२ षटकात १ बाद ४२ धावा केल्या होत्या. भारतातर्फे रोहित शर्मा १३ धावावर बाद झाला. त्यानंतर धवन - रहाणे जोडीने ५५ धावांची भागीदारी करत सोपा विजय मिळवला. धवनने ४६ चेंडूत ४६ धावा तडकावल्या तर रहोणेने २४ चेंडूत २२ धावांचे योगदान दिले.
या मालिकेतिल दुसऱ्या विजयासह भारताने ३ टी २० सामन्याच्या मालिकेत १-२ ने विजय मिळवला. 
तिसऱ्या व निर्णायक टी २० सामन्यात भारताने श्रीलंकेला लोळवत  ICC चे टी २० मधील आपले प्रथम स्थान कायम राखले. या विजयाचा फायदा भारतास आगामी टी २० विश्वचषकात नक्कीच होईल. या विजयामुळे भारताच्या खेळाडूचे मनोबल नक्कीच वाढले असेल. 
 
त्यापुर्वी, तिसऱ्या व निर्णायक टी २० सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजानी सार्थ ठरवत लंकेच्या तगड्या फलंदाजीला खिंडार पाडले. आर अश्विनच्या फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात लंकेचेचे फलंदाज अडकले, अश्विनने ४ तर रैनाने २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. भारतीय फिरकी गोंलदाजीमुळे श्रीलंका २० षटकेही खेळू शकली नाही. श्रीलंकेने १८ षटकात सर्वबाद ८२ धावाचं केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी ८३ धावांचे मोजकेच अव्हान मिळाले ते भारताने लिलया पार केले.  
 
श्रीलंकेकडून दासुन सनाका (१९), निरोशन डिकवेला (२), दिलशान (१), कर्णधार चंडीमल (८), असेला गुणरत्ने (४), मिलिंदा सिरिवर्धना (४), सेकुगे प्रसन्ना (९), तिसारा परेरा (१२ ), सचित्र सेनानायके (८) धावांचे योगदान दिले. 
 
पुण्यातील पराभवानंतर रांचीत दणकेबाज विजय मिळवून ताकद दाखवणारा भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या 
तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज आश्विनने श्रीलंकन फलंदाजांची दानादान उडवली. आश्विनने श्रीलंकेच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढताना लंकेचे चार फलंदाज माघारी परतवले. तर त्याला अनुभवी नेहराने उत्तम साथ दिली. अश्विन-नेहरा जोडीने पावर प्लेच्या पहिल्या सहा षटकात लंकेला धूळ चारली. पहिल्या सहा षटकातच लंकेचा अर्धा संघ तंबूत पाठवला गेला.  
 
भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे लंकेचा अर्धा संघ पावरप्लेच्या ६ षटकात तंबूत परतला. अश्विनने आपल्या ४ षटकात ८ धावा देत ४ गडी बाद केले. रैनाने २ गड्याला बाद केले तर प्रत्येकी एका फलंदाजाला नेहरा, बुमरहा आणि जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. आर अश्विनने लंकेला आपल्या पहिल्या २ षटकात ३ धक्के देत श्रीलंकेच्या भक्कम फलंदाजीला खिंडार पाडले. अश्विनने आपल्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर निरोशन डिकवेला २ धावांवर आणि सहाव्या चेंडूवर धोकदायक दिलशानला १ धावांवर माघारी झाडले. तर आपल्या वैयकतिक दुसऱ्या आणि संघाच्या तिसऱ्या षटकात कर्णधार चंडिमलला ८ धावावर बाद केले. अश्विनने भेदक गोंलदाजी करत श्रीलंकेच्या भक्कम फलंदाजीला खिंडार पाडले.
 
पर्तिस्पर्धी संघ - 
भारत :
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युवराजसिंग, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, हार्दिक पंड्या.
श्रीलंका :
दिनेश चंडीमल (कर्णधार), दुष्मंता चामिरा, निरोशन डिकवेला, तिलकरत्ने दिलशान, दिलहारा फर्नांडो, असेला गुणरत्ने, तिसारा परेरा, सेकुगे प्रसन्ना, सचित्र सेनानायके, दासुन सनाका, मिलिंदा सिरिवर्धना.
 

Web Title: Ashwin, Sri Lanka's 9-wicket win over Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.