गोलंदाजीमध्ये आश्विन अव्वल दहांमध्ये
By admin | Published: June 26, 2015 01:16 AM2015-06-26T01:16:28+5:302015-06-26T01:16:28+5:30
भारतीय आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने आयसीसी वन-डे मानांकनामध्ये दोन स्थानांनी प्रगती करून गोलंदाजीमध्ये दहावे स्थान पटकावले.
दुबई : भारतीय आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने आयसीसी वन-डे मानांकनामध्ये दोन स्थानांनी प्रगती करून गोलंदाजीमध्ये दहावे स्थान पटकावले. बांगलादेशाविरुद्ध तीन वन-डे सामन्यांत ६ बळी घेणारा आश्विन बुधवारी संपलेल्या मालिकेत भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. अव्वल १० मध्ये समावेश असलेला तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे.
बांगलादेशाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानने ३ सामन्यांत १३ बळी घेतले आहेत. गोलंदाजी क्रमवारीत आॅस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क अव्वल स्थानी असून, मुस्तफिजूर ८८व्या स्थानी आहे. दुखापतीमुळे या मालिकेला मुकलेला मोहंमद शमी अव्वल २०मध्ये समावेश असलेला दुसरा भारतीय गोलंदाज आहे. शमी १२व्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)