आश्विनला परदेशात यश मिळेल : स्वॉन
By admin | Published: July 20, 2014 12:58 AM2014-07-20T00:58:35+5:302014-07-20T00:58:35+5:30
भारताचा स्टार फिरकी गोलंदाज आर. आश्विन याला परदेशी खेळपट्टय़ांवर यश मिळू शकते, असे मत इंग्लंडचे माजी ऑफ स्पिनर ग्रॅमी स्वॉन यांनी व्यक्त केले आह़े
Next
लंडन : भारताचा स्टार फिरकी गोलंदाज आर. आश्विन याला परदेशी खेळपट्टय़ांवर यश मिळू शकते, असे मत इंग्लंडचे माजी ऑफ स्पिनर ग्रॅमी स्वॉन यांनी व्यक्त केले आह़े इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या दुस:या कसोटी सामन्यात मात्र अंतिम 11 खेळाडूंत भारताच्या आश्विनला संधी मिळाली नाही़
स्वॉन यांनी पुढे सांगितले, की लॉर्ड्सवर सुरू असलेल्या दुस:या कसोटी सामन्यात आश्विनला संघात घ्यायला हवे होत़े कारण, त्याने अद्याप परदेशी खेळपट्टय़ांवर जास्त गोलंदाजी केलेली नाही़ त्याला लॉर्ड्सवर संघात स्थान दिले असते, तर त्याच्या गोलंदाजीचा कर्णधाराला अंदाज आला असता़’’ भारतातील खेळपट्टय़ांवर आश्विनने शानदार कामगिरी केली आह़े त्यामुळे त्याच्यात कोणत्याही देशात उत्कृष्ट गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, यात शंका नाही, असेही मत स्वॉन यानी व्यक्त केल़े
भारताकडून 19 कसोटी सामन्यांत आश्विनने तब्बल 1क्4 विकेट मिळविल्या आहेत़ आपला अखेरचा कसोटी सामना त्याने डिसेंबर 2क्13मध्ये खेळला होता़ स्वॉन पुढे म्हणाले, की इंग्लंडमध्ये खेळताना पहिल्यांदा बचावात्मक भूमिका घेणो गरजेचे असते; मात्र कसोटीच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी आक्रमक खेळ केला जाऊ शकतो़
हा माजी गोलंदाज पुढे म्हणाला, ‘‘मी कसोटी सामन्यात सुरुवातीचे दोन दिवस आक्रमक गोलंदाजी करीत नव्हतो़ अशा परिस्थितीत शॉर्ट लेग, डीप मिडविकेट आणि कॅचिंग मिडविकेटला खेळाडू उभे करून गोलंदाजी करायचो़ फलंदाजाने स्ट्रेट शॉट किंवा फ्लिक करण्याचा प्रयत्न केल्यास ङोलबाद होण्याची शक्यता असायची़’’ (वृत्तसंस्था)