अश्विनी-ज्वालाने पटकावले कॅनडा ओपनचे जेतेपद
By admin | Published: June 29, 2015 12:15 PM2015-06-29T12:15:36+5:302015-06-29T12:19:37+5:30
अश्विनी पोनप्पा व ज्वाला गुट्टा या दुहेरीतील भारताच्या आघाडीच्या जोडीने कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले
Next
ऑनलाइन लोकमत
कॅलगरी, दि. २९ - अश्विनी पोनप्पा व ज्वाला गुट्टा या दुहेरीतील भारताच्या आघाडीच्या जोडीने कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. ज्वाला व अश्विनीने एफ.जे. मस्किन्स व सेलेने पिएक या अग्रमानांकित जोडीचा २१-१९, २१-१६ असा पराभव करत या स्पर्धेच्या महिला दुहेरीचा खिताब पटकावला.
पहिल्या सेटमध्ये प्रतिस्पर्ध्यांनी अश्विनी व ज्वालाला कडवी लढत दिल्याने त्यांनी तो सेट २१-१९ अशा अवघ्या दोन गुणांच्या फरकाने जिंकला. मात्र त्यानंतर अश्विनी व ज्वालाने आपले वर्चस्व राखत दुसरा सेट २१-१६ अशा फरकाने जिंकून विजेतेपदावर नाव कोरले.