आशिया कप सायकलिंग :भारताच्या सुशिकला आगाशेला दुहेरी मुकुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:14 AM2017-10-11T00:14:44+5:302017-10-11T00:14:52+5:30

अखिल भारतीय सायकलिंग महासंघाच्यावतीने आयोजित ट्रॅक आशिया कप अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सुशिकला आगाशे, मयूरी लुटे, अभिषेक काशीद, जे. के. आश्विन यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकून पहिला दिवस गाजविला.

Asia Cup Cycling: Sushilkumar Agashele of India doubles crown | आशिया कप सायकलिंग :भारताच्या सुशिकला आगाशेला दुहेरी मुकुट

आशिया कप सायकलिंग :भारताच्या सुशिकला आगाशेला दुहेरी मुकुट

Next

पुणे : अखिल भारतीय सायकलिंग महासंघाच्यावतीने आयोजित ट्रॅक आशिया कप अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सुशिकला आगाशे, मयूरी लुटे, अभिषेक काशीद, जे. के. आश्विन यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकून पहिला दिवस गाजविला. दुसरीकडे जयश्री आणि वैष्णवी गबने यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममधील वेलोड्रमवर सुरू झालेल्या या स्पर्धेत भारतीय सायकलपट्टूंनी पाच सुवर्णांसह एकूण नऊ पदके जिंकली. ज्युनिअर मुलींच्या सांघिक स्प्रिंट प्रकारात सुशिकला आगाशे आणि मयूरी लुटेने ज्युनिअर मुलींच्या गटात सांघिक स्प्रिंट प्रकारात ३७.००० सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. जयश्री आणि वैष्णवी गबने या टीम एसएआयएनसीएने ३९.५४४ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्य पदक आपल्या नावावर केले. दुसरीकडे ५०० मीटर टाईम ट्रायलमध्ये सुशिकला आगाशेने ३७.७०२ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. ज्युनिअर मुलांच्या गटात जे. के. आश्विन, मयूर पवार व अभिषेक काशिद या भारतीय त्रिकुटाने सांघिक स्प्रिंट प्रकारात ४७.३९७ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्ण पदक संपादन केले.

ज्युनिअर मुलांच्या गटात १५ किलोमीटर पॉर्इंट रेस प्रकारात आश्विन पाटीलने २९ गुण संपादन करून सुवर्णपदक जिंकत भारताचे खाते उघडले. याच प्रकारात नमन कपिलने गुणांसह रौप्य पदक जिंकले.

Web Title: Asia Cup Cycling: Sushilkumar Agashele of India doubles crown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.