आशिया चषकाची फायनल भारत आणि बांगलादेश संघांमध्ये, बांगलादेशचा पाकिस्तानवर ५ गडी राखून दणदणीत विजय
By admin | Published: March 2, 2016 10:29 PM2016-03-02T22:29:10+5:302016-03-02T22:43:10+5:30
सौम्य सरकार (४८)च्या दमदार खेळीच्या जोरावर बागंलादेशने पाकिस्तानला ५ विकेटने पराभव करत आशिया चषकाच्या अंतिम फेरित धडक मारली, आंतिम फेरित त्यांची लढत भारताशी होईल
Next
>मिरपूर, दि. २ - सौम्य सरकार (४८)च्या दमदार खेळीच्या जोरावर बागंलादेशने पाकिसतानला ५ विकेटने पराभव करत आशिया चषकाच्या अंतिम फेरित धडक मारली, आंतिम फेरित त्यांची लढत भारताशी होईल. यजमान बांगलादेशने आज करो या मरो लढतीत संपूर्ण सामन्यात पाकिस्तावर वर्चस्व गाजवले.
गुणतालिकेत भारताचे ३ सामन्यात ६ गुण असून भारताचा एक सामना बाकी आहे. तो यूएई बरोबर असल्यामुळे गुणतालिकेत भारतच आघाडीवर राहील. बांगलादेश संघाने अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानला ५ गड्यांनी पराभव करत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आणि आपली अंतिम सामन्यातील दावेदारी निच्छित केली. ३ मार्च रोजी भारताचा मुकाबला यूएईशी होइल तर ४ मार्च रोजी पाकिस्तान आणि श्रीलंकेत औपचारिक लढत होणार आहे कारण दोन्ही संघाचे आशिया चचषकातील आव्हान संपूष्टात आलेले आहे. ६ मार्च रोजी भारत आणि बांगलादेशमध्ये आशिया चषकाची अंतिम लढत होणार आहे.
त्यापूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला सर्फराज अहमदच्या झुंजार अर्धशतकी खेळीनंतर बांगलादेशाने आशिया चषक ट्वेंटी - २० क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला २० षटकांत १२९ धावांवर रोखले. पाकिस्तानकडून सर्फराज अहमदने ४२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५८ धावांची खेळी केली. शोएब मलिकने ३० चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ४१ धावा फटकावल्या. बांगलादेशाकडून अल अमीन हुसेन याने २५ धावांत ३ गडी बाद केले. त्याला अराफत सन्नी याने ३५ धावांत २ गडी बाद करून साथ दिली. तस्कीन अहमद आणि मोर्तझा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करण्याचा पाकिस्तानचा निर्णय चुकीचा ठरवताना बांगलादेशाच्या गोलंदाजांनी ८.२ षटकांतच त्यांची अवस्था ४ बाद २८ अशी दयनीय केली. अखेर सर्फराज अहमद आणि शोएब मलिक यांनी पाचव्या गड्यासाठी ४४ चेंडूंत केलेल्या ७० धावांच्या भागीदारीमुळे पाकिस्तानला २० षटकांत ७ बाद १२९ पर्यंत मजल मारता आली.