आशियाई चॅम्पियनशिपचा अनुभव राष्ट्रकुल स्पर्धेत कामी येईल- अलका तोमर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:29 AM2018-03-19T01:29:42+5:302018-03-19T01:29:42+5:30
पीडब्ल्यूएलमधून मिळालेला आत्मविश्वास आणि आशियाई चॅम्पियनशिपच्या अनुभवाच्या जोरावर महिला पहिलवान पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत चांगला खेळ करतील,असे मत भारतीय महिला कुस्ती संघाच्या प्रशिक्षक अलका तोमर यांनी व्यक्त केले.
लखनौ : पीडब्ल्यूएलमधून मिळालेला आत्मविश्वास आणि आशियाई चॅम्पियनशिपच्या अनुभवाच्या जोरावर महिला पहिलवान पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत चांगला खेळ करतील,असे मत भारतीय महिला कुस्ती संघाच्या प्रशिक्षक अलका तोमर यांनी व्यक्त केले.
तोमर यांनी सांगितल की,‘भारतीय पहिलवान आता जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत लढतील. त्यासाठी त्यांना मानसिक रूपाने तयार रहावे लागेल.’ त्या पुढे म्हणाल्या की,‘सर्व खेळाडू राष्ट्रकुल स्पर्धेत पूर्ण तयारीने खेळतील. नुकत्याच झालेल्या पीडब्ल्यूएलने खेळाडूंच्या मनातून दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडूंबाबत वाटणारी भीती दूर झाली आहे.’
तोमर पुढे म्हणाल्या की,‘पूजा ढांडाच्या या लीगमधील विक्रमाने अन्य भारतीय महिला पहिलवानांमध्ये आत्मविश्वास देखील निर्माण झाला आहे. त्यामुळेच आशियाई चॅम्पियनशिपमध्ये गेल्या काही दिवसात आमची महिला खेळाडू जपानी दिग्गज खेळाडूला पराभूत करण्यात यशस्वी ठरली.’
विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणाºया पहिल्या भारतीय महिला खेळाडू असलेल्या अलका तोमर यांनी सांगितले की,‘ दिग्गज खेळाडूंसोबत सराव केल्याने त्यांचे तंत्र जाणून घेतल्याने तसेच त्यांचा सामना करण्याची मोठी संधी मिळाल्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना फायदा होत आहे. या तिन्ही बाबी पीडब्लूएलमुळे शक्य झाल्या.’
आशियाई चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी खेळाडू नवज्योत कौर हिने सांगितले की,‘दिग्गज खेळाडूंसोबतच्या लढतीविषयी वाटणारी आमची भीती आता संपली आहे. आमचे पहिलवान आता मोकळेपणाने त्यांचा सामना करतात.’ (वृत्तसंस्था)
>महिला, पुरुष संघ...
भारतीय महिला पहिलवान सध्या लखनौमध्ये सराव करत आहेत. संघात विनेश (५० किलो), बबिता (५३ किलो), पूजा ढांडा (५७ किलो), साक्षी मलिक (६२ किलो), दिव्या काकरान (६८ किलो) आणि किरण (७६ किलो) यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, पुरुषांच्या गटात राहुल आवारे (५७ किलो), बजरंग पुनिया (६५ किलो), सुशील (७४ किलो), सोमवीर (८६ किलो), मौसम खत्री (९७ किलो) आणि सुमित (१२५ किलो) यांचा समावेश आहे.