Asian Game 2018: दीपा कर्माकरचा 'बोल्ड' लूक, बघा ओळखू येतेय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 01:48 PM2018-08-16T13:48:07+5:302018-08-16T13:59:25+5:30
Asian Game 2018: रिओ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेची सिमोन बिल्स, रशियाची मारिया पासेका आणि स्वित्झर्लंडच्या ज्युलिया स्टेंग्रूबर यांनी जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकारात अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई केली.
मुंबई - रिओ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेची सिमोन बिल्स, रशियाची मारिया पासेका आणि स्वित्झर्लंडच्या ज्युलिया स्टेंग्रूबर यांनी जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकारात अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई केली. पण, त्यांच्यापेक्षा प्रोदुनोव्हा प्रकाराच्या अंतिम लढतीत भारताच्या दिपा कर्माकरने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. दिपाचे कांस्यपदक थोडक्यात हुकले होते. पण, दिपाच्या त्या भरारीने संपूर्ण देशाला एक नवी ऊर्जा दिली.. नवी प्रेरणा दिली... नवा खेळ दिला... विशेष म्हणजे भारतीय मुलींसमोर तिने एक आदर्श ठेवला. दिपाच्या या यशस्वी भरारीनंतर भारतात जिम्नॅस्टिक्सचे वारे वाहू लागले.
2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर दिपाच्या नावाची चर्चा सूरू झाली होती. पण, तिला प्रसिद्धी मिळवून दिली ती ऑलिम्पिक स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर... शांत, लाजरी, स्वतःच्याच कोशात राहणारी दिपा स्टार बनली. पण, तिने आपले पाय जमिनीवरच ठेवले. कोणत्याही समारंभाला दिपा त्याच पूर्वीच्या साध्या वेशात आणि लाज-या स्वभावात दिसली. मात्र, दिपाने गुरूवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोने सर्वांना अचंबित केले आहे.
So excited to be on the August cover of @womenfitnessorg
— Dipa Karmakar (@DipaKarmakar) August 16, 2018
😁 Full interview: https://t.co/2sRmuoQ6zX#womenfitness#gymnastics#covergirlpic.twitter.com/kpsccT1ihn
2015च्या आशियाई जिम्नॅस्टीक्स अजिंक्यपद स्पर्धेत आणखी एक कांस्यपदक जिंकणा-या दिपाला 2017 मध्ये पद्म श्री पुरस्काराने गौरविण्यात आले. दुखापतीनंतर ती बराच काळ स्पर्धेपासून दूर होती आणि तिने नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड चँलेंज स्पर्धेतील सुवर्णपदकाने कमबॅक केले. आगामी आशियाई स्पर्धेत ती पुन्हा एकदा पदक पटकावण्यासाठी सज्ज झाली आहे. या स्पर्धेला जाण्यापूर्वी तिने 'वुमन फिटनेस इंडिया' या मॅगझीनला खास मुलाखत दिली आणि त्यासाठी तिने खास फोटोशूटही केले. युवा पिढीला फिटनेसचा मंत्र तिने या मुलाखतीतून दिला आहे, परंतु लाजऱ्या दिपाचा 'बोल्ड' लूक चर्चेचा विषय ठरत आहे.