Asian Games 2018: 18व्या आशियाई स्पर्धेचे सूप वाजले, 2022मध्ये चीनमध्ये भरणार कुंभमेळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 06:16 PM2018-09-02T18:16:56+5:302018-09-02T18:17:34+5:30

Asian Games 2018: पंधरा दिवस जकार्ता येथे रंगलेल्या क्रीडा कुंभमेळ्याची रविवारी सांगता झाली. जितक्या जल्लोषात 18 व्या आशियाई स्पर्धेची सुरूवात झाली होती, त्याच उत्साहात या स्पर्धेचा निरोप समारंभ पार पडला.

Asian Games 2018: The 18th Asian games closing ceremony, next asian games at China in 2022 | Asian Games 2018: 18व्या आशियाई स्पर्धेचे सूप वाजले, 2022मध्ये चीनमध्ये भरणार कुंभमेळा

Asian Games 2018: 18व्या आशियाई स्पर्धेचे सूप वाजले, 2022मध्ये चीनमध्ये भरणार कुंभमेळा

Next

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः पंधरा दिवस जकार्ता येथे रंगलेल्या क्रीडा कुंभमेळ्याची रविवारी सांगता झाली. जितक्या जल्लोषात 18 व्या आशियाई स्पर्धेची सुरूवात झाली होती, त्याच उत्साहात या स्पर्धेचा निरोप समारंभ पार पडला. भारताने आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना आशियाई स्पर्धेत आपली ताकद वाढली असल्याचे दाखवून दिले. भारताने 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य अशी एकून 69 पदकांची कमाई करताना आठवे स्थान पटकावले.  महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने निरोप समारंभात भारतीय पथकाचे नेतृत्व केले. ध्वजधारकाचा मान तिला देण्यात आला होता.



पदकांच्या क्रमवारीत चीनने पुन्हा एकदा आपली मक्तेदारी सिद्ध केली. चीनने 289 (132 सुवर्ण, 92 रौप्य व 65 कांस्य) पदक जिंकली. त्यापाठोपाठ जपान 205 ( 75 सुवर्ण, 56 रौप्य व  74 कांस्य) आणि दक्षिण कोरिया 177 ( 49 सुवर्ण, 58 रौप्य व 70 कांस्य) पदकांसह अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. त्यानंतर इंडोनेशिया ( 98 पदकं), उजबेकिस्तान ( 70 ), इराण ( 62) आणि चायनीज तैपेई ( 67) यांनी स्थान पटकावले आहे. यावेळी इंडोनेशियाचे पंतप्रधान जोको विडोडो यांनी सर्व खेळाडूंचे आभार मानले.

पुढील आशियाई स्पर्धा 2022 मध्ये चीनमधील हँगझाऊ शहरात होणार आहे. 10 ते 25 सप्टेंबर असा या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. 



 

Web Title: Asian Games 2018: The 18th Asian games closing ceremony, next asian games at China in 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.