Asian Games 2018: अब तक 68; आशियाई स्पर्धेतील भारताची आजवरची सर्वोत्तम कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 01:43 PM2018-09-01T13:43:17+5:302018-09-01T13:43:35+5:30
Asian Games 2018: भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धेच्या 14व्या दिवशी सकाळच्या सत्रात दोन सुवर्णपदकाची कमाई केली.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धेच्या 14व्या दिवशी सकाळच्या सत्रात दोन सुवर्णपदकाची कमाई केली. बॉक्सर अमित पांघलने 49 किलो वजनी गटात, तर प्रणब बर्धन आणि शिबनाथ सरकार यांनी ब्रिज स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात सुवर्णपदक जिंकून भारताची पदकसंख्या 68वर नेली. आशियाई स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. स्क्वॉशमध्ये भारतीय महिला संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
News Flash: Squash | India go down to Hong Kong 0-2 in Women's Team Event Final as Joshna Chinappa loses the 2nd Singles match
— India@AsianGames2018 (@India_AllSports) September 1, 2018
Silver for India
Well done girls
PS: Won Silver in 2014 edition also #AsianGames2018pic.twitter.com/qKkpJVcQlG
पांघलने 49 किलो वजनी गटाच्या बॉक्सिंग सामन्यात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हसनबोय दुस्मातोव्हचा पराभव करत भारताला 14 वे सुवर्ण जिंकून दिले.
Our 22yr old #TOPSAthlete, Amit, earned a brilliant GOLD beating the #Olympic champion in men’s 49 kg #Boxing.🥇
— SAIMedia (@Media_SAI) September 1, 2018
This is India’s 66th medal at the #AsianGames2018, making it the maximum we have ever won at the #AsianGames
So proud!#SAI@BFI_official#KheloIndia🇮🇳🥊 pic.twitter.com/0UL5kAR1WR
त्यापाठोपाठ प्रणब बर्धन आणि शिबनाथ सरकार यांनी ब्रिज पुरुष दुहेरीत आणखी एक सुवर्ण जिंकून भारताला 15वे सुवर्णपदक जिंकून दिले. भारताने 2010च्या ग्वांझाऊ आशियाई स्पर्धेत एकूण 65 पदकं जिकंली होती आणि ती भारताची आशियाई स्पर्धेतील आजवरची सर्वोत्तम कामगिरी होती. तो विक्रम आज मोडला.
Here we’ve India’s 1st gold medalist in the debut sport of #Bridge.
— SAIMedia (@Media_SAI) September 1, 2018
Many congratulations to the men’s pairs team of 60yr old #PranabBardhan & 56yr old #ShibnathSarkar.
This’s also India’s 15th Gold medal equalling the record set in 1951. #IndiaAtAsianGames#KheloIndia🇮🇳🥇 pic.twitter.com/VQ7D04Nu7k
जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत भारताने 15 सुवर्ण, 23 रौप्य आणि 29 कांस्यपदकांसह एकूण 67 पदकं नावावर केले आहेत.
Most medals for India 🇮🇳 in #AsianGames
— Mohandas Menon (@mohanstatsman) September 1, 2018
67* Jakarta 2018
65 Guangzhou 2010
57 New Delhi 1982
57 Incheon 2014
53 Doha 2006
52 Jakarta 1962
51 New Delhi 1951#AsianGames2018
आशियाई स्पर्धेतील सर्वाधिक 15 सुवर्ण जिंकण्याच्या विक्रमाशीही भारताने यंदा बरोबरी केली. 1951च्या नवी दिल्ली आशियाई स्पर्धेत भारताने सर्वाधिक 15 पदकं जिंकली होती आणि जकार्तातही भारताच्या नावे 15 सुवर्णपदकं झाली आहेत.
Most #GOLD medals for India 🇮🇳 in #AsianGames
— Mohandas Menon (@mohanstatsman) September 1, 2018
15 New Delhi 1951
15* Jakarta 2018
14 Guangzhou 2010
13 New Delhi 1982
12 Jakarta 1962
11 Bangkok 1978
11 Busan 2002
11 Incheon 2014
10 Doha 2006#AsianGames2018