Asian Games 2018: बॉक्सर अमित पांघलचा सोनेरी ठोसा, भारताला 14वे सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 12:52 PM2018-09-01T12:52:34+5:302018-09-01T13:00:01+5:30
Asian Games 2018: ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हसनबोय दुस्मातोव्हचा पराभव करत सुवर्णपदकाची कमाई.
जकार्ता: आशियाई क्रीडा स्पर्धाः भारताच्या अमित पांघलने 49 किलो वजनी गटाच्या बॉक्सिंग सामन्यात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हसनबोय दुस्मातोव्हचा पराभव करत भारताला 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमधील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. 2010च्या आशियाई स्पर्धेतील विकास कृष्णनला दुखापतीमुळे 75 किलो वजनी गटातून माघार घेतल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
Our 22yr old #TOPSAthlete, Amit, earned a brilliant GOLD medal in men’s 49 kg #Boxing.🥇
— SAIMedia (@Media_SAI) September 1, 2018
This is India’s 66th medal at the #AsianGames2018, making it the maximum we have ever won at the #AsianGames
So proud!#SAI@BFI_official@AIBA_Boxing#IndiaAtAsianGames#KheloIndia🇮🇳🥊 pic.twitter.com/sWYsIpE9Jg
49 किलो गटाच्या अंतिम लढतीच्या पहिला फेरीत दोन्ही खेळाडूंनी सावध खेळ केला. अमितने सुरेख बचाव करताना उजबेकिस्तानच्या खेळाडूला गुण मिळवण्यापासून रोखले. 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अमितचा खेळ उल्लेखनीय झाला. त्याने ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूला तोडीसतोड उत्तर दिले. हरयाणाच्या अमितने 2017 मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. अमितने 3-2 अशा फरकाने बाजी मारताला भारताला सुवर्णपदक जिंकून दिले.