Asian Games 2018: भारताच्या राष्ट्रगीतावेळी चीन, पाकिस्तानलाही उभं राहावं लागतं तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 11:52 AM2018-08-28T11:52:37+5:302018-08-28T11:52:51+5:30
Asian Games 2018: भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला. तसेच आशियाई स्पर्धेतील भालाफेक प्रकारातील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. त्यामुळे नीरजला स्वतःचाच अभिमान वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेकांनी नीरजच्या कामगिरीचे तौंडभरून कौतुक केले. पण, सोशल मीडियावर नीरजच्या बाबतीत दुसरीच गोष्ट अधिक व्हायरल होत आहे.
( Asian Games 2018: नीरज चोप्राने केली या दिग्गजाच्या विक्रमाशी बरोबरी )
सुवर्णपदक स्वीकारताना स्टेडियमवर वाजलेले भारताचे राष्ट्रगीत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पदक वितरण सोहळ्यात नीरज मध्यभागी उभा होता आणि भारताचा तिरंगा डौलाने फडकत होता. हे दृश्य पाहताना देशवासीय अधिक भावूक झाले होते.
का होतोय हा व्हिडीओ व्हायरल... पाहा.
Goosebumps when we see the Tiranga up there! Thank you for the honour, #NeerajChopra !
— गीतिका (@ggiittiikkaa) August 27, 2018
Hello Media, here's presenting Real Youth Icons of India! pic.twitter.com/WnzoMBf45p
When India 🇮🇳 flying high above China 🇨🇳 & Pakistan 🇵🇰 its the Proudest Moment!! Thanks you @Neeraj_chopra1 for this historic moment! Super proud on your Golden performance.. #AsianGames2018#Javelin #NeerajChoprapic.twitter.com/lbjQ7ouy8l
— Rahul Lodha (@rklodha) August 27, 2018
नीरजने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकताना भारताचे कट्टर वैरी असलेल्या चीन आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना मात दिली. त्यामुळे ज्यावेळी भारताचे राष्ट्रगीत सुरू असताना कट्टर वैऱ्यांनाही गपगुमान उभे रहावे लागले. चीन आणि पाकिस्तानच्या झेंड्यांमध्ये तिरंगा डौलाने फडकताना पाहून भारतीयांना अधिक आनंद झाला. चीनच्या लियू क्विझेन आणि पाकिस्तानच्या अशरद नदीम यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.