Asian Game 2018: राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या मीराबाई चानूची माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 10:58 AM2018-08-07T10:58:19+5:302018-08-07T10:58:50+5:30
Asian Games 2018: विश्वविजेत्या मीराबाई चानूने आगामी आशियाई स्पर्धेतून माघार घेतली आहे. तिने तशी विनंती भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाकडे केली आहे.
मुंबई - विश्वविजेत्या मीराबाई चानूने आगामी आशियाई स्पर्धेतून माघार घेतली आहे. तिने तशी विनंती भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाकडे केली आहे. मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी मीराबाईच्या फिटनेसविषयी चिंता व्यक्त केली होती. तिने जकार्ता स्पर्धेतून माघार घ्यावी आणि नोव्हेंबरमध्ये आयोजित ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.
मीराबाईच्या पाठीच्या खालच्या भागात मे महिन्यात दुखणे उमळले होते. ही समस्या कायम असून वजन उचलण्याचा सराव करताना त्रास होत आहे. मागच्या आठवड्यात दुखणे बरे वाटू लागताच मीराबाईने मुंबईत सरावाला सुरूवात केली होती. मात्र कालपासून पुन्हा दुखण्याने उचल खाल्ली.
Weightlifter Saikhom Mirabai Chanu will not participate in the Asian Games. She had written a letter to Indian Weightlifting Federation requesting them to give her rest as she is not currently fit, owing to a backache, and wants to prepare for Olympics qualifier. (file pic) pic.twitter.com/7Q198b9Yka
— ANI (@ANI) August 7, 2018
विजय म्हणाले,‘मी महासंघाला अहवाल दिला आहे. आता महासंघाने निर्णय घ्यावा. इतक्या कमी वेळात अधिक वजन उचलणे योग्य नाही. ऑलिम्पिक पात्रता फेरीवर लक्ष दिल्यास देशाचा लाभ होईल. ऑलिम्पिक पात्रता फेरीचे आयोजन १ नोव्हेंबरपासून होईल. मीराबाईच्या लिगामेंटमधील जखम अतिशय लहान असल्याने एमआरआय आणि सिटीस्कॅनद्वारे शोध घेता आला नाही.’
दरम्यान भारोत्तोलन महासंघाचे सचिव सहदेव यादव यांनी मीराबाईला खेळविण्याचा निर्णय गुरुवारी होईल, असे सांगितले. मीराबाई आशियाडमध्ये सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार असल्याने तिच्या माघारीमुळे मोठे नुकसान होणार आहे. मणिपूरच्या या खेळाडूने मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये विश्व स्पर्धेच्या ४८ किलो गटात १९४ किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सर्वोत्कृष्ट कामगिरीसह राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत सुवर्ण पदक पटकाले होते.