Asian Games 2018: भारतीय बॉक्सर्सच्या ठोशाला घाबरून पाकिस्तानी खेळाडूनं काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 04:18 PM2018-08-25T16:18:21+5:302018-08-25T16:18:41+5:30
Asian Games 2018: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील खेळाडू कोणत्याही मैदानावर समोरासमोर आले की तेथील वातावरण चांगलेच तापले. त्याचा प्रत्यय आशियाई स्पर्धेतील बॉक्सिंग रिंगमध्ये आला.
जकार्ता - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील खेळाडू कोणत्याही मैदानावर समोरासमोर आले की तेथील वातावरण चांगलेच तापले. त्याचा प्रत्यय आशियाई स्पर्धेतील बॉक्सिंग रिंगमध्ये आला. महिला गटातील 60 किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात भारताची पवित्रा आणि पाकिस्तानची पर्वीन रुखसाना समोरासमोर आल्या. पण, भारतीय बॉक्सर्सच्या ठोशासमोर पाकिस्तानी खेळाडूचा निभाव लागला नाही.
#TeamIndia at the #AsianGames2018#Pavitra defeated Pakistan's #RukhsanaPerveen in their Round of 16 match of the #Boxing Women's Lightweight 60kg event. She progresses to the Quarter-finals stage and will face #HuswatunHasanah of Indonesia. #AllTheBest#IAmTeamIndiapic.twitter.com/gxn2I0KoPr
— Team India (@ioaindia) August 25, 2018
पवित्राने पहिल्याच फेरीत जोरदार आक्रमण करून रुखसानाला रिंग सोडून पळ काढण्यास भाग पाडले. पंचांना मध्यस्थी करून पहिल्या फेरीतच सामना थांबवाव लागला आणि पवित्राला विजयी घोषित करावे लागले. पविश्राने तांत्रिक आघाडीच्या जोरावर हा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.