Asian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 07:37 PM2018-08-19T19:37:11+5:302018-08-19T19:37:29+5:30
बजरंगने 65 किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावले आहे.
जकार्ता : भारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. बजरंगने कुस्तीतील 65 किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावले आहे. भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे.
#AsianGames India's Bajrang Punia wins gold in Men's 65kg freestyle wrestling finals. pic.twitter.com/c8ut1yN1pe
— ANI (@ANI) August 19, 2018
बजरंगने 65 किलो वजनीगटामध्ये जपानच्या मल्लाचा 10-8 असा पराभव केला आणि सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीचा सामना चांगलाच रंगतदार झाला. हा सामना नेमका कोण जिंकेल, हे सहजासहजी सांगता येत नव्हते. पण बजरंगने तांत्रिक गोष्टींवर जास्त भर दिला. त्याचबरोबर अनुभवही त्याने पणाला लावला होता. अखेरच्या काही क्षणांमध्ये बजरंगने सरस खेळ केला. त्यामुळेच त्याला हे सुवर्णपदक पटकावता आले.
बजरंगची दमदार कामगिरी
Breaking News: India get 1st GOLD MEDAL of #AsianGames2018 as Bajrang Punia beats Japanese grappler 10-8 in Final (FS 65 kg). yupeeeeeee #AsianGames2018pic.twitter.com/fMshTJ8tzE
— India@AsianGames2018 (@India_AllSports) August 19, 2018