Asian Games 2018: अमित पांघल झाला या अभिनेत्यासाठी ' यमला पगला दीवाना'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 02:58 PM2018-09-02T14:58:07+5:302018-09-02T14:58:26+5:30
Asian Games 2018: भारताला आशियाई स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये एकमेव सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या अमित पांघलवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. या सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरने एक इच्छा व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील दिग्गज नायकासाठी तो 'यमला पगला दीवाना' झाला आहे.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारताला आशियाई स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये एकमेव सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या अमित पांघलवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. अमितने आशियाई स्पर्धेच्या 14व्या दिवशी 49 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हसनबोय दुस्मातोव्हचा पराभव केला. या स्पर्धेतील भारताचे बॉक्सिंगमधील पहिलेच सुवर्णपदक ठरले. या सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरने एक इच्छा व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील दिग्गज नायकासाठी तो 'यमला पगला दीवाना' झाला आहे.
A special moment for Indian sports! The courageous and immensely talented Amit Panghal wins the Gold in the Men’s 49kg boxing event. Proud of him! #AsianGames2018pic.twitter.com/SUpJP1DSTT
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2018
अमितने ट्विटर अकाऊंट ओपन करताना सर्वांचे आभार मानले. तसेच वडील विजेंदर पांघल व प्रशिक्षक अनिल धनखड यांच्यासह आपणही दिग्गज नायक धर्मेंद्र यांचे चाहते असल्याचे जाहीर केले. त्याने असे लिहिले की,' धर्मेंद्र यांचा चित्रपट टीव्हीवर सुरू असताना ब्रेकमध्येही वडील चॅनेल बदलायला देत नव्हते. सुवर्णपदक जिंकण्याचा शुभ मुहूर्तावर धर्मेंद्र यांची भेट झाल्यास आनंद द्विगुणीत होईल.'
जकार्ता में स्वर्ण पदक देश को समर्पित.. बधाईयों के लिए सभी का आभार 🙏
— Amit Panghal (@AmitPan00039986) September 1, 2018
मेरा पहला ट्वीट अपने पिताजी और कोच साहब की दिली ख्वाहिश बताने के लिए। दोनों धर्मेंद्र जी के जबरदस्त फैन हैं। उनकी फिल्म के ब्रेक में भी चैनल नहीं बदलने दिया कभी।
धर्म जी से मुलाकात हो जाए तो खुशी दोगुनी होगी। pic.twitter.com/ZJNRTQC0mK
अमितचा हा ट्विट अल्पावधीतच प्रचंड व्हायरल झाला. धर्मेंद्र यांनीही अमितची ही इच्छा पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
Proud of you @AmitPan00039986 .मुझे भी आप से मिलके बहुत खुशी होगी| जब भी मुंबई आओगे ,बता दें|बधाई हो,आपको, आपके गुरु और आपके परिवार को|आप हर प्रतियोगिता में जीत हासिल करके अपने देश का नाम रोशन करें, ईश्वर से यही प्रार्थना करता हूँ. https://t.co/Eao51Iw7ap
— Dharmendra Deol (@aapkadharam) September 2, 2018