Asian Games 2018 : 'सुवर्णकन्या' विनेश फोगाट दुखावली; नीरज चोप्रासोबत 'जोडी' जमवणाऱ्यांना चपराक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:26 AM2018-08-23T11:26:59+5:302018-08-23T11:27:22+5:30
Asian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धेतील कुस्ती संकुलात विनेश फोगटचा अंतिम सामना पाहण्यासाठी भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा कुस्ती संकुलात पोहोचला, तेव्हा त्याला ओळखणाऱ्या भारतीय पत्रकार आणि काही भारतीय प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या.
मुंबई - आशियाई क्रीडा स्पर्धेतील कुस्ती संकुलात विनेश फोगटचा अंतिम सामना पाहण्यासाठी भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा कुस्ती संकुलात पोहोचला, तेव्हा त्याला ओळखणाऱ्या भारतीय पत्रकार आणि काही भारतीय प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या. काही वृत्तपत्रांनी लगेचच त्याचे आणि विनेशचे नक्कीच काही तरी प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा सुरू केली. पण, या वायफळ चर्चांना विनेशने त्वरित उत्तर दिले.
Really sad to see that a simple gesture of being present when one athlete is chasing glory for #India is painted in the wrong light 😔 Myself and @Neeraj_chopra1 and every other Indian athlete will support each other to ALWAYS make 🇮🇳 proud, nothing more! Thank you 🙏 pic.twitter.com/LnQAQIGcwu
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) August 22, 2018
आपल्या देशाचा एक खेळाडू सुवर्णपदकाच्या लढतीत जिंकण्यासाठी प्रयत्न करताना त्याचे मनोबल उंचावण्यासाठी आलेल्या सहकाऱ्याच्या उपस्थितीचा असा अर्थ लावणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया विनेशने दिली.
विनेशची अंतिम लढत पाहण्यासाठी भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि त्याचा सहकारी, मीडिया प्रेस सेंटरमध्ये पोहोचले. मात्र, नीरजने ती लढत पूर्ण पहिलीच नाही. सामना जसा संपला तसा नीरज परत निघाला, पदक वितरणसाठी थांबलासुद्धा नाही. मात्र, त्याच्या उपस्थितीचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आणि विनेशच्या उत्तरानंतर त्यानेही या वृत्ताचा समाचार घेतला.
साथी खिलाड़ियों का मनोबल बढ़ाना और उनके गर्व के पल में वहीं पे खड़े होकर उनको प्रोत्साहित करना ये हमारे लिए महत्वपूर्ण है. हर सच्चा खिलाड़ी यही करेगा. हमारा सोभाग्य है अपने देश के लिए मेडल आते देखना🇮🇳🙏 https://t.co/ZOOqiJpD6Y
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) August 22, 2018