Asian Games 2018 : हीना, राही, मनू यांच्याकडून सुवर्णाची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 05:07 AM2018-08-13T05:07:13+5:302018-08-13T05:09:01+5:30

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ खूप ताकदवान दिसत आहे. सर्व नेमबाज उत्तम कामगिरी करून पात्र ठरले आहेत, ते निश्चितच उत्तम कामगिरी करतील.

Asian Games 2018 : Gold's expectations from Heena, Rahi, Manu | Asian Games 2018 : हीना, राही, मनू यांच्याकडून सुवर्णाची अपेक्षा

Asian Games 2018 : हीना, राही, मनू यांच्याकडून सुवर्णाची अपेक्षा

googlenewsNext

- अंजली भागवत

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ खूप ताकदवान दिसत आहे. सर्व नेमबाज उत्तम कामगिरी करून पात्र ठरले आहेत, ते निश्चितच उत्तम कामगिरी करतील. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपेक्षा आशियाई स्पर्धा खूप कठीण असणार आहे. कारण, आॅलिम्पिकमधील बहुतांश पदकविजेते आशियातूनच आहेत. पदकं जिंकण्याबद्दल बोलायचं झालं तर, ते त्या दिवसावर व परिस्थितीवर अवलंबून असणार. काहीवेळा दुर्दैवाने अत्यंत कमी मार्जिनद्वारे शॉट चुकू शकतो आणि पदकसुद्धा निसटते. मिश्र संघ नेमबाजी प्रकार उत्साहवर्धक वातावरण आहे आणि भारतीय नेमबाजांनी तिथे पदक जिंकण्याची चांगली संभावना आहे. भारतीय महिला नेमबाज हीना सिध्दू, मनू भाकर, श्रेयशी सिंग, अपूर्वी चंदेला यांच्याकडून उत्तम कामगिरी पाहण्यास नक्कीच मिळेल. राही सरनोबतसुद्धा पुनरागमन करीत आहे आणि पदक जिंकण्यात सक्षम आहे. तरुण नेमबाजांनी मुक्त मनाने व कुठलेही दडपण न घेता लक्ष साधावे लागणार आहे तरच यश नक्कीच मिळेल असा विश्वास वाटतो.
गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय नेमबाजांनी केलेल्या अविश्वसनीय कामगिरीनंतर, आता सर्व लक्ष आशियाई क्रीडा स्पर्धांकडे लागले आहे. भारतीय नेमबाज आपला ठसा उमटवीत असले, तरीही आशियाई क्रीडामध्ये आव्हान कठीण असणार आहे. चीनने नेमबाजीमध्ये १९७ सुवर्णपदकांसह एकूण ३९५ पदकं जिंकली आहेत. दक्षिण कोरिया २४३ पदकांसह दुसऱ्या, तर जपान १५१ पदकांसह तिसºया स्थानावर आहे. भारतीय नेमबाजांनी गत आशियाई स्पर्धेपर्यंत केवळ ७ सुवर्णपदके जिंकली आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा किती खडतर आहे, हे भारताच्या पदक संख्येवरून कळून येते. भारताची ताकद असलेले शूटिंगचे टीम इव्हेंट दुर्दैवाने या आशियाई स्पर्धेतून वगळण्यात आले आहे. या वेळी फक्त २० आहेत. मिश्र संघांचे १० मीटर एअर रायफल, १० मीटर एअर पिस्तूल आणि ट्रॅप अशा तीन स्पर्धा ऐतिहासिक ठरणार आहेत. एकाच देशाकडून केवळ दोन नेमबाज प्रत्येक इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतात, त्यामुळे भारतीय नेमबाजांची निवड खूप अवघड होती.
अनुभवी नेमबाजांकडून पदकांची अपेक्षा
तीन आशियाई क्रीडा पदक जिंकणारा संजीव राजपूत आपल्या चौथ्या पदकासाठी उत्सुक दिसत आहे. ३७ वर्षीय संजीव आपल्या चौथ्या आशियाई क्रीडामध्ये आवडता ५० मीटर रायफल थ्री पोझीशनमध्ये स्पर्धा करेल. १० मीटर एअर रायफल स्पर्धा भारतासाठी खूप प्रतिष्ठितची आहे. बिंद्राने निवृत्ती घेतल्यामुळे आणि नारंगच्या अनुपस्थितीमुळे रवी कुमार आणि दीपक कुमार यांना उत्तम संधी लाभली आहे. ४२ वर्षांचा मानवजीत सिंग संधूही ट्रॅप स्पर्धेत या वेळीसुद्धा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ही त्याची सहावी आशियाई स्पर्धा असणार आहे, या अनुभवी खेळाडूने आशियाई क्रीडा स्पर्धेत ५ पदके जिंकली आहेत आणि कदाचित आपल्या अनुभवाच्या जोरावर सहावे पदक जिंकेल.

तरुण क्रांती
गेले ते दिवस जेव्हा खेळाडूंना वयाच्या विसाव्या वर्षांनंतरच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करता येईल. आपले तरुण खेळाडू निर्भय, झटपट प्रतिक्षेप आणि आपल्या खेळाच्या बाबतीत खूप एकाग्र आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा दबाव नाही, ते आपल्या खेळाचा आनंद घेतात आणि म्हणूनच पदके जिंकतात. बºयाच  तरुण खेळाडूंसाठी ही पहिली आशियाई स्पर्धा असेल. पदकांची अपेक्षा करणे कदाचित चुकीचे; परंतु दबाव नसल्यामुळे ते उत्तम कामगिरी दर्शवतील. १५ वर्षांचा अनीश भानवाला, २०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये २५ मीटर रॅपीड फायर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळविणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला. तो आशियाई स्पर्धेतसुद्धा उत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. वर्ल्ड कप आणि २०१८ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण जिंकणारी मनू भाकरकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. एल्व्हिनिल व्हॅलेरिव्हन हीदेखील पहिल्यांदाच सीनियर गटामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत आहे, तरीसुद्धा तिच्याकडे पदकाच्या अपेक्षेने बघितले जात आहे.

(शब्दांकन : अभिजित देशमुख)
 

Web Title: Asian Games 2018 : Gold's expectations from Heena, Rahi, Manu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.