Asian Games 2018: गोपीचंद सर नसते तर... द्युतीच्या यशामागे मोठं योगदान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 10:01 AM2018-08-27T10:01:48+5:302018-08-27T10:02:18+5:30
Asian Games 2018: चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमबॅक करताना द्युती चंदने आशियाई स्पर्धेत भारताला महिलांच्या 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकून दिले.
जकार्ता - चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमबॅक करताना द्युती चंदने आशियाई स्पर्धेत भारताला महिलांच्या 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकून दिले. 2014मध्ये द्युतीला प्रतिबंधक द्रव्याचे सेवन केल्याप्रकरणी चार वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. मात्र. त्याविरोधात तीने क्रीडा लवादाकडे दाद मागितली आणि तिचा विजय झाला. मात्र, बंदीच्या काळात द्युतीला कोणीही आधार दिला नाही.
Congrats Dutee Chand for #AsianGames2018 silver medal- W 100m- 11.32s, another great day for #TeamIndiaAthletics in #Jakarta; Let's keep winning team 💪 #WillToWin#EnergyOfAsia
— Athletics Federation of India (@afiindia) August 26, 2018
PC- @rahuldpawar@DuteeChand@sports_odisha@rvineel_krishna@Naveen_Odisha@ioaindiapic.twitter.com/FJuFbbGEWb
नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या द्युतीच्या मदतीला बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद पुढे आले. त्यांनी तिला नैराश्यातून बाहेर काढले आणि त्यांच्या हैदराबाद येथील अकादमीत राहण्यास सांगितले. द्युतीने ज्यावेळी आशियाई रौप्यपदक जिंकले तेव्हा गोपीचंद यांच्या आनंदासमोर गगन ठेंगणे वाटत होते. गोपीचंद म्हणाले, आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. द्युतीने करून दाखवले. ती माझ्यासह सर्व खेळाडूंची प्रेरणास्थान आहे. तिच्या जिद्दीला आणि दृढनिश्चयाला सलाम. कठीण प्रसंगाशी दोन हात करणाऱ्या प्रत्येक खेळाडूची ती रोल मॉडल आहे.
द्युतीने 20 वर्षांनंतर भारताला आशियाई स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत पदक जिंकून दिले आहे. यापूर्वी 1998 साली रचिता मिस्त्रीने कांस्यपदक जिंकले होते. 22 वर्षीय द्युतीचे हे पहिलेच आशियाई पदक आहे. ती म्हणाली, 2014 चे वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात खराब वर्ष होते. लोकं माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा करत होते. आज त्याच मुलीने कमबॅक करताना देशाला पदक जिंकून दिले.