Asian Games 2018: हिमा दास व मोहम्मद अनासने जिंकले रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 05:41 PM2018-08-26T17:41:59+5:302018-08-26T18:11:43+5:30
Asian Games 2018: भारताच्या हिमा दासने 400 मीटर शर्यतीत 50.79 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदकाची कमाई केली. पुरुष गटात भारताच्या मोहम्मद अनासने 45.69 सेकंदाची वेळ नोंदवली.
जकार्ता - भारताच्या हिमा दासने 400 मीटर शर्यतीत 50.79 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदकाची कमाई केली. पुरुष गटात भारताच्या मोहम्मद अनासने 45.69 सेकंदाची वेळ नोंदवली.
News Flash: Muhammed Anas wins Silver medal in Men's 400m (clocking 45.69s)
— India@AsianGames2018 (@India_AllSports) August 26, 2018
Proud of you #AsianGames2018pic.twitter.com/pJuumZ8iQs
नुकत्याच झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या 18 वर्षीय हिमाची ही पहिलीच आशियाई स्पर्धा होती आणि त्यात तिने रौप्यपदक जिंकले. याच गटात भारताच्या निर्मलाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. हिमाने या कामगिरीसह राष्ट्रीय विक्रमही नोंदवला.
News Flash: 18 yr old Hima Das wins Silver medal in 400m (clocked 50.79s)
— India@AsianGames2018 (@India_AllSports) August 26, 2018
Such a proud moment. Wow! #AsianGames2018pic.twitter.com/CBYb4iT33D
जागतिक स्पर्धेत ( 20 वर्षांखालील) आसामच्या हिमाने 51.46 सेकंदाची वेळ नोंदवून 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक नावावर केले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आणि त्याशिवाय ट्रॅक प्रकारातील भारताचे हे पहिलेच सुवर्ण ठरले.