Asian Games 2018: टेबल टेनिस संघाचे ऐतिहासिक पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 03:58 PM2018-08-28T15:58:30+5:302018-08-28T15:58:44+5:30
Asian Games 2018:भारताच्या टेबल टेनिस पुरुष संघाने मंगळवारी इतिहास घडवला.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारताच्या टेबल टेनिस पुरुष संघाने मंगळवारी इतिहास घडवला. त्यांनी भारताला आशियाई स्पर्धेत टेबल टेनिसमधील पहिले पदक जिंकून दिले. उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाकडून 3-0 असा पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
Historic medal in #TableTennis!
— SAIMedia (@Media_SAI) August 28, 2018
Congratulations to the team of @sathiyantt,@sharathkamal1,@HarmeetDesai(3 #TOPSAthlete), @manavthakkar16 & #AnthonyAmalraj for winning a bronze medal in Men’s Team event.
It’s #India’s 1st ever #AsianGames medal in TT. #AsianGames2018🇮🇳🏓🥉 pic.twitter.com/HY0WE54V1R
भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत जपानचा पराभव करून ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, उपांत्य फेरीत गतउपविजेत्या कोरियाकडून हार पत्करावी लागली. ग्यानसेकरण साथियन, अचंता शरथ कमल आणि अमलराज अँथोनी यांना कडव्या संघर्षानंतरही पराभव पत्करावा लागला.
अनुभवी शरथ कमलचे स्वप्न साकार
शरथ कमल याला चौथ्या प्रयत्नात आशियाई पदक जिंकता आले. 2006 ते 2014 या कालावधीत तीन आशियाई स्पर्धेत सहभाग घेतला. यंदाची स्पर्धा ही त्याची अखेरची आशियाई स्पर्धा होती आणि त्यात पदक जिंकल्याचे त्याने समाधान व्यक्त केले आहे.
Absolutely chuffed after having beaten the Japanese table tennis team in the quarterfinals of the @asiangames2018 by 3-1. Bring on the Semi-finals!! C'mon Indiaaaa!!!! @TableTennisInd#LetsGo#IndianTableTennis#TTFI#ITTF#AgainstAllOdds#WePulledThrough#jakartapalembang2018pic.twitter.com/2pYLxGiDiM
— Sharath Kamal (@sharathkamal1) August 28, 2018