Asian Games 2018: भालाफेकीत नीरज चोप्राने रचला इतिहास; भारताला आठवे सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 05:43 PM2018-08-27T17:43:32+5:302018-08-27T18:39:24+5:30
Asian Games 2018: भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
जकार्ता : भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे. नीरजने यावेळी 88.06 मी भाला फेकला आणि भारताला आठवे सुवर्णपदक जिंकवून दिले.
#AsianGames2018: India's Neeraj Chopra wins a gold medal in men's javelin throw final. pic.twitter.com/29BXLADs1i
— ANI (@ANI) August 27, 2018
विश्व कनिष्ट अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यावर नीरज प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर त्याने आशियाई अजिंक्यपद आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. पण आशियाई स्पर्धेतील त्याचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे.