Asian Games 2018: भारताला नेमबाजीने कमावून दिले पहिले पदक; अपूर्वी आणि रवी यांना कांस्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 02:42 PM2018-08-19T14:42:49+5:302018-08-19T14:43:09+5:30
भारताच्या अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारातील मिश्र दुहेरीमध्ये कांस्यपदक पटकावले.
जकार्ता : भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिले पदक मिळवून दिले ते भारताच्या नेमबाजपटूंनी. भारताच्या अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारातील मिश्र दुहेरीमध्ये कांस्यपदक पटकावले.
What a feeling this is!!! 👏🇮🇳👏
— Team India (@ioaindia) August 19, 2018
Congratulations @apurvichandela and #RaviKumar on your Bronze medal winning performance. Immensely proud of your inspiring achievement at the 18th #AsianGames#TeamIndia@RaninderSingh#IAmTeamIndiapic.twitter.com/wbZTwYvchL
10 मीटर एअर रायफल प्रकाराच्या मिश्र दुहेरीमध्ये अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम फेरीत भारताच्या या जोडीने 835.3 गुणांची कमाई केली. रवीने यावेळी 420 गुणांची कमाई केली, तर अपूर्वाने 415.3 एवढे गुण मिळवले.
#AsianGames2018 Shooting 10m Air Rifle Mixed Team qualification event concluded with the pair of @apurvichandela 415.3 and #RaviKumar 420.0 qualifying for the Finals.
— Team India (@ioaindia) August 19, 2018
Total #Score stood at 835.3! #Congratulations#TeamIndia 🇮🇳 pic.twitter.com/Yk5DAHidUa