Asian Games 2018: भारतीय नेमबाजांचा 'सुवर्ण' भेद पुन्हा हुकला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 03:46 PM2018-08-20T15:46:00+5:302018-08-20T15:49:24+5:30

Asian Games 2018: \भारतीय नेमबाजांनी आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दोन रौप्यपदक जिंकून दिले.

Asian Games 2018: Indian shooters miss gold again | Asian Games 2018: भारतीय नेमबाजांचा 'सुवर्ण' भेद पुन्हा हुकला

Asian Games 2018: भारतीय नेमबाजांचा 'सुवर्ण' भेद पुन्हा हुकला

googlenewsNext

जकार्ता - भारतीय नेमबाजांनी आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दोन रौप्यपदक जिंकून दिले. सकाळच्या सत्रात दीपक कुमारने 10 मीटर एअर रायफल प्रकारात, तर 19 वर्षीय लक्ष्य शेओरन याने पुरूषांच्या ट्रॅप प्रकारात रौप्यपदक जिंकले. अंतिम फेरीत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्याने दोघांनाही 'सुवर्ण' भेद करता आला नाही. अगदी थोडक्यात त्यांचे सुवर्णपदक हुकले.

10 मीटर एअर रायफल प्रकारत दीपकने पात्रता फेरीतील सुमार कामगिरीनंतर अंतिम फेरीत जोरदार कमबॅक केले. त्याने 247.7 गुणांसह रौप्यपदकावर कब्जा केला. सुवर्णपदकाच्या शर्यतीत त्याने चीनच्या यांग हाओरानला कडवी झुंज दिली. चीनी खेळाडूने 249.1 गुणांच्या आशियाई स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. चायनीज तैपेईच्या लू शाओचूनने ( 226.8) कांस्यपदक जिंकले. भारताच्या रवी कुमारला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. 



पुरूषांच्या ट्रॅप प्रकारात लक्ष्य आणि अनुभवी मानवजीत सिंग संधू यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. 30व्या फेरीपर्यंत मानवजीत आणि लक्ष्य यांनी अव्वल तिघांमध्ये स्थान कायम राखले होते, मात्र, पुढील पाच प्रयत्नांत मानवजीतचे तीन प्रयत्न हुकले आणि तो पदकशर्यतीतून बाद झाला. त्यामुळे लक्ष्यवर सर्व जबाबदारी आली. त्यानेही सुवर्णपदकाच्या शर्यतीत झेप घेतली. 

त्याच्यासमोर चायनीज तैपेईच्या यांग कुनपीचे आव्हान होते. लक्ष्यने अखेरच्या 15 प्रयत्नांत केवळ एकदाच अपयश आले आणि तेच त्याला महागात पडले. कुनपीचे 50 पैकी दोन नेम चुकले आणि त्याने विश्वविक्रमाची बरोबरी केली. कुनपीने 48 गुणांची कमाई केली आणि 2017 मध्ये स्पेनच्या अलबर्टो फर्नांडेझने विश्वविक्रम नोंदवला होता.


दरम्यान महिलांच्या ट्रॅप प्रकारात सीमा तोमरला अंतिम फेरीत सहाव्या स्थानावरच समाधान मानावे लागले. तिने 25 पैकी 12 गुणच कमावले. 



 

Web Title: Asian Games 2018: Indian shooters miss gold again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.