Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत भारतीयांची सर्वोत्तम कामगिरी; हे आहेत पदकवीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 12:35 PM2018-09-02T12:35:10+5:302018-09-02T12:35:22+5:30
Asian Games 2018: भारताने आशियाई स्पर्धेतील आत्तापर्यंतंची सर्वोत्तम कामगिरी जकार्ता येथे केली.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारताने आशियाई स्पर्धेतील आत्तापर्यंतंची सर्वोत्तम कामगिरी जकार्ता येथे केली. बॉक्सर अमित पांघल आणि ब्रिज प्रकारातील पुरुष दुहेरी गटातील सुवर्णपदकाने भारतीय संघाने आशियाई स्पर्धेचा सुवर्ण निरोप घेतला. त्यात पुरुष हॉकी संघाने कांस्यपदकाच्या लढतीत पाकिस्तानला नमवून एका पदकाची भर घातली. त्यामुळे आशियाई स्पर्धेत भारतीयांच्या पदकांची एकूण संख्या 69 अशी झाली.
India reaches its best ever medal haul of 69 medals,4 more than in 2010; Also reaching 15 gold medals India equalled the record set in 1951.
— SAIMedia (@Media_SAI) September 1, 2018
With 24 silvers we have crossed the previous record of 19 set in 1982 #AsianGames.
Good show, #TeamIndia!🇮🇳@Ra_THORe#SAI#KheloIndiapic.twitter.com/YRQoe2W2dx
भारताने या स्पर्धेत 15 सुवर्णपदक जिंकले आणि आशियाई स्पर्धेतील सर्वाधिक 15 सुवर्ण जिंकण्याच्या 1951 सालच्या विक्रमाशी बरोबरी केली. भारताने जकार्तात 24 रौप्यपदक जिंकून विक्रमच केला आहे. एकूण पदकाच्या बाबतित 2010 साली भारताने जिंकलेली 65 पदकं आघाडीवर होती, परंतु तोही विक्रम 2018 मध्ये मोडला. अपेक्षेनुसार अॅथलेटिक्समध्ये भारतीयांनी सर्वाधिक पदकं जिंकली. ट्रॅक अॅण्ड फिल्ड प्रकारात भारताने 7 सुवर्ण, 10 रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण 19 पदकं जिंकली. त्यापाठोपाठ नेमबजी व कुस्ती या खेळांचा समावेश आहे..
बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी एकेरीत पदक जिंकून इतिहास घडवला. कुस्तीमध्ये विनेश फोगट आणि बजरंग पुनिया हे नवे स्टार आपल्याला मिळाले. त्याशियावच टेनिस, सेपाकटक्राव, अश्वशर्यत, वुशू, ब्रिज आणि कुराश या खेळांनी आपल्याला अनपेक्षित यश मिळवून दिले..
चला तर मग जाणून घेऊया आपले पदक विजेते खेळाडू कोण ते...
अॅथलेटिक्स
पुरुष 800 मी. मनजित सिंग सुवर्ण
पुरुष 1500 मी. जिन्सन जॉन्सन सुवर्ण
पुरुष गोळाफेक तेजिंदरपाल सिंग तूर सुवर्ण
पुरुष भालाफेक नीरज चोप्रा सुवर्ण
पुरुष तिहेरी उडी अरपिंदर सिंग सुवर्ण
महिला 4x400 रिले हिमा दास सुवर्ण
एम आर पुवम्मा
सरिता गायकवाड
व्ही. के. विस्मया
महिला हेप्टॅथ्लॉन स्वप्ना बर्मन सुवर्ण
पुरुष 400 मी. मोहम्मद अनास रौप्य
पुरुष 800 मी. जिन्सन जॉन्सन रौप्य
पुरुष 400 मी. हर्डल्स धारून अय्यासामी रौप्य
पुरुष 4x400 रिले अरोकिया राजीव रौप्य
मोहम्मद अनास
धारुन अय्यासामी
मुहम्मल कुन्हू
जिथू बेबी व सुरेश करेकोप्पा
महिला 100 मी. द्युती चंद रौप्य
महिला 200 मी द्युती चंद रौप्य
महिला 400 मी. हिमा दास रौप्य
महिला 3000 मी स्टीपलचेस सुधा सिंग रौप्य
महिला लांब उडी नीना वाराकिल रौप्य
मिश्र 4x400 रिले एम. आर. पुवम्मा रौप्य
महिला 1500 मी. पी. यू. चित्रा कांस्य
महिला थाळी फेक सीमा पुनिया कांस्य
नेमबाजी
पुरुष 10 मी. एअर पिस्तुल सौरभ चौधरी सुवर्ण
महिला 25 मी. पिस्तुल राही सरनोबत सुवर्ण
पुरुष 10 मी. एअर रायफल दीपक कुमार रौप्य
पुरुष 50 मी. रायफल थ्री पोझिशन संजीव राजपूत रौप्य
पुरुष ट्रॅप प्रकार लक्ष्य शेओरन रौप्य
पुरुष डबल ट्रॅप प्रकार शार्दूर विहान रौप्य
पुरुष 10 मी. एअर पिस्तुल अभिषेक वर्मा कांस्य
महिला 10 मी. एअर पिस्तुल हिना सिधू कांस्य
मिश्र 10 मी. एअर रायफल अपूर्वी चंडेला व रवी कुमार कांस्य
कुस्ती
पुरुष 65 किलो बजरंग पुनिया सुवर्ण
महिला 50 किलो विनेश फोगट सुवर्ण
महिला 68 किलो दिव्या काकरन कांस्य
ब्रिज
पुरुष दुहेरी प्रणब बर्धन व शिबनाथ सरकार सुवर्ण
पुरुष सांघिक जग्गी शिवदासनी, राजेश्वर तेवारी कांस्य
अजय खरे, राजू तोलानी,
देबब्रता मजुमदार व सुमित मुखर्जी
मिश्र संघ किरण नाडर, हेमा देवरा कांस्य
हिमानी खांडेलवाल, बचिराजू सत्यनायरण
गोपिनाथ मन्ना व राजीव खांडेलवाल
रोईंग
पुरुष क्वाड्रंप्ल स्कल सवर्ण सिंग, दत्तू भोकनळ सुवर्ण
ओम प्रकाश व सुखमीत सिंग
पुरुष सिंगल स्कल दुश्यंत चौहान कांस्य
पुरुष डबल स्कल रोहित कुमार, भगवान सिंग कांस्य
टेनिस
पुरुष दुहेरी रोहन बोपण्णा व दिवीज शरण सुवर्ण
पुरुष एकेरी प्रज्नेश जीपी कांस्य
महिला एकेरी अंकिता रैना कांस्य
बॉक्सिंग
पुरुष लाइट फ्लाय अमित पांघल सुवर्ण
पुरुष मिडलवेट विकास कृष्णन कांस्य
तिरंदाजी
कम्पाऊंड पुरुष संघ रजत चौहान, अमन सैनी व अभिषेक वर्मा रौप्य
कम्पाऊंड महिला संघ मुस्कान किरार, मधुमिता कुमारी व ज्योती वेन्नम रौप्य
अश्वशर्यत
इव्हेंटींग वैयक्तिक फौआद मिर्झा रौप्य
इव्हेंटींग सांघिक राकेश कुमार, आशिष मलिक रौप्य
जितेंदर सिंग व फौआद मिर्झा
स्क्वॉश
महिला संघ जोश्ना चिनप्पा, दीपिका पल्लीकल रौप्य
सुनन्या कुरुविल्ला व तन्वी खन्ना
पुरुष एकेरी सौरव घोषाल कांस्य
पुरुष संघ सौरव घोषाल रमित तंडन कांस्य
हरिंदर पाल सिंग संधू व महेश माणगावकर
महिला एकेरी जोश्ना चिनप्पा कांस्य
महिला एकेरी दीपिका पल्लीकल कांस्य
नौकानयन
49er FX Women वर्षा गौतम व श्वेता शेर्वेगर रौप्य
49er Men वरुण ठक्कर व गणपथी चेंगप्पा कांस्य
Open Laser 4.7 हर्षिता तोमर कांस्य
बॅडमिंटन
महिला एकेरी पी. व्ही. सिंधू रौप्य
महिला एकेरी सायना नेहवाल कांस्य
हॉकी
महिला संघ रौप्य
पुरुष संघ कांस्य
कबड्डी
महिला संघ रौप्य
पुरुष संघ कांस्य
कुराश
महिला 52 किलो पिंकी बल्हारा रौप्य
महिला 52 किलो मलप्रभा जाधव कांस्य
वुशू
पुरुष सांडा 56 किलो संतोष कुमार कांस्य
पुरुष सांडा 60 किलो सुर्यभानू प्रताप सिंग कांस्य
पुरुष सांडा 65 किलो नरेंदर ग्रेवाल कांस्य
महिला सांडा 60 किलो रोशिबिनादेवी कांस्य
टेबल टेनिस
पुरुष संघ अचंता शरथ कमल, जी. साथियन कांस्य
हरमीत देसाई, अँथोनी अमलराज व मानव ठक्कर
मिश्र दुहेरी अचंता शरथ कमल व मनिका बात्रा कांस्य
सेपाकटक्राव
पुरुष संघ रेगू कांस्य