Asian Games 2018: विनेश फोगाटनं रचला 'सोनेरी' इतिहास, भारताला दुसरं सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 05:51 PM2018-08-20T17:51:40+5:302018-08-20T17:51:57+5:30
विनेशने 50 किलो वजनीगटाच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावले.
जकार्ता : भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने आशिया क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सुवर्णपदक मिळवून दिले. भारतासाठी हे आतापर्यंतचे दुसरे सुवर्णपदक ठरले. विनेशने 50 किलो वजनीगटाच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावले. विनेशने अंतिम फेरीत जपानच्या युकी इरीवर 6-2 असा विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत विनेशने इतिहास रचला आहे. कारण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी विनेश ही पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे.
News Flash: GOLD Medal for Vinesh Phogat as she beats Japanese wrestler 4-2 in Final (50 kg). yupeeeeeeee #AsianGames2018pic.twitter.com/kkKiwM8PA9
— India@AsianGames2018 (@India_AllSports) August 20, 2018
विनेशची आतापर्यंतची आशियाई स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. कारण यापूर्वी विनेशला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले होते. विनेशने गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.