Asian Games 2018 : भारताची गोल्डन कमाई, आतापर्यंत 7 सुवर्ण अन् 5 रौप्य पदके जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 11:46 AM2018-08-25T11:46:59+5:302018-08-26T06:43:52+5:30

Asian Games 2018 LIVE: आशियाई स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताने एक सुवर्ण व तीन कांस्यपदकाची कमाई केली.

Asian Games 2018 LIVE: Muhammed Anas Yahiya in the semifinals | Asian Games 2018 : भारताची गोल्डन कमाई, आतापर्यंत 7 सुवर्ण अन् 5 रौप्य पदके जमा

Asian Games 2018 : भारताची गोल्डन कमाई, आतापर्यंत 7 सुवर्ण अन् 5 रौप्य पदके जमा

Next

#Hockey भारतीय महिलांनी अखेरच्या 8 मिनिटांत तीन गोलचा पाऊस पाडताना B गटातील सामन्यात दक्षिण कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. नवनीत कौर व वंदना कटारिया यांनी प्रत्येकी एक, तर गुरूजीत कौरने दोन गोल केले. आशियाई स्पर्धेत  भारताच्या खात्यात 7 सुवर्ण, 5 रौप्य आणि 17 कांस्य पदके जमा झाली आहेत. 



#Squash सौरव घोषालचे सुवर्ण स्वप्न भंगले. कांस्यपदकावर समाधान. सौरवला 2-0 असे आघाडीवर असूनही हाँगकाँगच्या चून मिंगवर विजय मिळवण्यात अपयश आले. उपांत्य फेरीच्या लढतीत चून मिंगने 3-2 असा रोमहर्षक विजय मिळवला. 

#Badminton मनू अत्री आणि बी. सुमिथ रेड्डी यांचा संघर्ष अपयशी. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनच्या ली जुनहूई आणि लीयू युचेन यांच्याकडून त्यांना हार पत्करावी लागली. 0-1 अशा पिछाडीवरून भारतीय खेळाडूंनी सामन्यात जोरदार कमबॅक केले. निर्णायक गेममध्येही भारतीय जोडीने चिनी खेळाडूंना 24 मिनिटे झुंजवले, परंतु चिनी खेळाडूंनी 21-13, 17-21, 25-23 अशी बाजी मारली. 

#Squash भारताच्या जोश्ना चिनप्पाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मलेशियाच्या शिवसागरी सुब्रमण्यमने 3-1 अशा फरकाने विजय मिळवला. 

#Squash भारताच्या दीपिका पल्लीकलला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीच्या लढतीत तिला अव्वल मानांकित निकोल डेव्हीडकडून पराभव पत्करावा लागला. 

#Badminton पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत. सिंधूने उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्काचा 21-12, 21-15 असा पराभव केला. 

#Archery भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाचेही आव्हान संपुष्टात. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण कोरियाकडून 5-1 असा पराभव. उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची व पदकाची संधी हुकली. 



 

#Badminton भारताला पुरुष दुहेरीत धक्का. कोरियाच्या चोई सोलीयू व कँग एम. या जोडीने अटीतटीच्या लढतीत भारताचा सात्विक रँकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडीवर 21-17, 19-21, 21-17 असा विजय मिळवला. 



 

# Archery भारताच्या महिला संघाला रिकर्व्ह गटात उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. चायनीज तैपेईच्या खेळाडूंनी 6-2 अशा फरकाने भारतावर विजय मिळवला. 


#Badminton भारताच्या सायना नेहवालने महिला एकेरीत इंडोनेशियाच्या फित्रीयानीचा 21-6, 21-14 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला



 

 

#Men’s 400m भारताच्या मोहम्मद अनास आणि राजीव अरोकिया यांनी 400 मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अनासने पात्रता फेरीत 45.63 सेकंदाची वेळ नोंदवली, तर राजीवने 46.82 सेकंदाच्या वेळेसह उपांत्य फेरीत स्थान पक्के केले.  




# Volleyball भारताच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाने मालदिव्सचा 3-0 असा पराभव करून F गटात सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. 
 

Web Title: Asian Games 2018 LIVE: Muhammed Anas Yahiya in the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.