Asian Games 2018 Live : बजरंगची सुवर्ण श्रद्धांजली, अटलबिहारी वाजपेयींना 'गोल्ड' समर्पित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 09:48 PM2018-08-18T21:48:38+5:302018-08-19T22:39:49+5:30
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे आजपासून आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 ला धुमधडाक्यात सुरुवात झाली. या स्पर्धेच्या धमाकेदार सोहळ्यात दिमाखात तिरंगा फडकला आहे. 18 व्या आशियाई स्पर्धेचा हा उद्घाटन सोहळा...
जकार्ता - भारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. बजरंगने कुस्तीतील 65 किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावले आहे. भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भारताचा गोल्डमन बजरंग पुनियाचे अभिनंदन केले आहे. आशियाई स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक असल्यामुळे हे अतिशय खास आहे, अशा शब्दात मोदींनी बजरंगचे कौतूक केले. त्यानंतर, बजरंगनेही धन्यवाद सर असा रिप्लाय मोदींच्या ट्विटला दिला आहे.
Congratulations @BajrangPunia for the memorable victory in the 65 kg freestyle wrestling. This win is even more special because it is India's first Gold in the @asiangames2018. Best wishes for your future endeavours. #AsianGames2018
— Narendra Modi (@narendramodi) August 19, 2018
भारतीय मल्ल आणि आशियाई स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण मिळवून देणाऱ्या बजरंगने आपले सुवर्णपदक दिवंगत भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केलं आहे. बजरंगने ट्विट करुन अटलजींना वंदन असेही म्हटले आहे.
#AsianGames का गोल्ड मैडल 🥇मैं स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी को समर्पित करता हूँ । नमन 🙏 pic.twitter.com/E28fQcKx2g
— Bajrang Punia (@BajrangPunia) August 19, 2018
Breaking News: India get 1st GOLD MEDAL of #AsianGames2018 as Bajrang Punia beats Japanese grappler 10-8 in Final (FS 65 kg). yupeeeeeee #AsianGames2018pic.twitter.com/fMshTJ8tzE
— India@AsianGames2018 (@India_AllSports) August 19, 2018
भारताच्या महिला हॉकी संघाने इंडोनेशियावर 8-0 असा विजय मिळवला
Just in: Women Hockey | India start on a winning note as they thrash minnows Indonesia 8-0 in their 1st Pool B match
— India@AsianGames2018 (@India_AllSports) August 19, 2018
To take on Kazakhstan next on Tuesday #AsianGames
भारताच्या पुरुष कबड्डी संघाने बांगलादेशनंतर श्रीलंकेवरही दमदार विजय मिळवला. भारताने श्रीलंकेला 44-28 असे पराभूत केले.
Just in: Kabaddi | Indian Men beat Sri Lanka 44-28 in their 2nd group match.
— India@AsianGames2018 (@India_AllSports) August 19, 2018
Earlier beat Bangladesh today #AsianGames2018pic.twitter.com/Vo1S4McWrC
संदीप तोमरला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का
#Wrestling at #AsianGames2018#TeamIndia's Sandeep Tomar lost his Men's 57kg Wrestling Freestyle Quarterfinal bout to Reza Atrinagharchi of Iran. Sandeep went down 9-15 after making a superb comeback.#IAmTeamIndiapic.twitter.com/ibBBdlFgBF
— Team India (@ioaindia) August 19, 2018
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे आजपासून आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 ला धूमधडाक्यात सुरुवात झाली. भारताने या स्पर्धेतील आपले खाते कांस्यपदकाने उघडले आहे. 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताला मिळालं कांस्यपदक, अपूर्वी चंदेला आणि रवी कुमारनं मिश्र दुहेरीत कांस्यपदक मिळवलं. 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताचा अपूर्वी चंदेला आणि रवीकुमार ही जोडी अंतिम फेरीत दाखल, भारतीय संघानं 835.3 पॉइंट्स मिळवले. रवी कुमारला 420.0 आणि अपूर्वीने 415.3 पॉइंट्स मिळवले. भाराताचा दिग्गज कुस्तीपटू सुशील कुमारला पहिल्याच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला, तर बजरंग पुनिया आणि संदीप तोमर यांनी विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला
या स्पर्धेच्या धमाकेदार सोहळ्यात दिमाखात तिरंगा फडकला. 18व्या आशियाई स्पर्धेचा हा उद्घाटन सोहळा बुंग कार्णो स्टेडियममध्ये 50 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत नृत्य, गाणे आणि आतषबाजीच्या नयनरम्य कलाविष्कारात पार पडला. भारतीय भाला फेक एथलिट नीरज चोपडा याने 572 सदस्यीय भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. यावेळी नीरजच्या हातात बुंग कार्णो स्टेडियममध्ये दिमाखात तिरंगा फडकत होता. नीरजच्या पाठीमागे भारतीय संघाचे प्रमुख बृजभूषण शरण आणि इतर भारतीय खेळाडू होते.
Live Upadate -
-भारताचा अनुभवी पैलवान सुशील कुमारचा पुरुषांच्या 74 किलोग्रॅम स्पर्धेतल्या क्वालिफिकेशन राऊंडमध्ये पराभव
#TeamIndia at the #AsianGames#Wrestling sensation #SushilKumar lost his first round qualification match of the 74kg Freestyle Wrestling against Adam Batirov of Bahrain's at the #AsianGames2018 by 3-5! Hoping for a Repechage match for Sushil now 🤞#IAmTeamIndiapic.twitter.com/1jR3iiu4GR
— Team India (@ioaindia) August 19, 2018
- 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताला मिळालं कांस्यपदक, अपूर्वी चंदेला आणि रवी कुमारनं मिश्र दुहेरीत कांस्यपदक मिळवलं.
- 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताचा अपूर्वी चंदेला आणि रवीकुमार ही जोडी अंतिम फेरीत दाखल, भारतीय संघानं 835.3 पॉइंट्स मिळवले. रवी कुमारला 420.0 आणि अपूर्वीने 415.3 पॉइंट्स मिळवले.
- 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड टीमचा क्वालिफिकेशन राऊंड सुरू, भारताचा अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार ही जोडी 835.3 पॉइंट्सनं दुस-या स्थानी, भारताला पदकाची आशा
#AsianGames2018 Shooting 10m Air Rifle Mixed Team qualification event concluded with the pair of @apurvichandela 415.3 and #RaviKumar 420.0 qualifying for the Finals.
— Team India (@ioaindia) August 19, 2018
Total #Score stood at 835.3! #Congratulations#TeamIndia 🇮🇳 pic.twitter.com/Yk5DAHidUa
- भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव
In a campaign for a third gold at the #AsianGames, first bit of great news comes from the Kabaddi arena in Jakarta as #TeamIndia Women clinch their first win against #TeamJapan! Congratulations 🇮🇳👏#Score 43-12 #IAmTeamIndiapic.twitter.com/45sZ2J6EiH
— Team India (@ioaindia) August 19, 2018
- भारतीय महिला कबड्डी टीम 41-12 पुढे खेळतेय
- पहिल्या हाफनंतर भारतीय महिला कबड्डी टीम 19-8नं पुढे
- भारतीय महिला टीम जपानहून 13-7ने पुढे
- भारताचा जलतरणपटू सौरभ सांगवेकर दुसऱ्या स्थानी, 1:54:87 वेळेत अंतर केलं पार.
- इंडोनेशियाची माजी बॅडमिंटन खेळाडू सुसी हिने आशियाई स्पर्धेची मशाल पेटवली. मशाल पेटवल्यानंतर इंडोनेशियन संस्कृतीची झलक विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येत आहे.
Susi Susanti lights the cauldron, and with this the torch completes its journey! The torch that has been brought from India and across Indonesia, has finally been placed in the cauldron! What a spectacular welcome! #OpeningCeremonyAsianGames2018#OpeningAG2018#AsianGames2018pic.twitter.com/aPcXNEd7fj
— Asian Games 2018 (@asiangames2018) August 18, 2018
Susi Susanti lights the cauldron, and with this the torch completes its journey! The torch that has been brought from India and across Indonesia, has finally been placed in the cauldron! What a spectacular welcome! #OpeningCeremonyAsianGames2018#OpeningAG2018#AsianGames2018pic.twitter.com/aPcXNEd7fj
— Asian Games 2018 (@asiangames2018) August 18, 2018
आशियाई स्पर्धेतील उद्घाटन सोहळ्यात दाझलिंग शो आकर्षक ठरला असून विद्युत रोषणाईने स्टेडियम उजाळल्याचे पाहायला मिळाले. स्टेडियमध्ये सर्वत्र विद्युत रोषणाई दिसून आली.
Indonesia put up a dazzling show at the Opening Ceremony of the 18th #AsianGames in Jakarta! The spectacular display of lights, colours and firework was a mesmerising experience. #OpeningAG2018#TeamIndia walked the Parade of the Athletes with Flag-bearer #NeerajChopra leading. pic.twitter.com/G7feKXBPmy
— Team India (@ioaindia) August 18, 2018
Walking the Parade of the Athletes at the Opening Ceremony of the 18th #AsianGames2018 in Jakarta is the country where it all started! #TeamIndia led by Javelin star #NeerajChopra at the GBK Main Stadium in Jakarta. 🇮🇳#IAmTeamIndia#AsianGames#AsianGamesOpeningpic.twitter.com/QzVwTiKPQi
— Team India (@ioaindia) August 18, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही इंडोनेशियामध्ये होत असलेल्या 18 व्या आशियाई स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी ट्वीट करताना, 'भारतीय संघाला इंडोनेशियातील आशियाई स्पर्धेसाठी शुभेच्छा। देशातील सर्वच भारतीयांना आमच्या खेळाडूंचा अभिमान आहे. तसेच या स्पर्धेत आमच्या खेळाडूंचे प्रदर्शन सर्वोत्कृष्ठ राहील, अशी आशा आम्हाला आहे, असे मोदींनी म्हटले आहे.
Best wishes to the Indian contingent for the @asiangames2018, which are being held in Indonesia. We are extremely proud of our athletes and I am sure they will give their best through the games. #AsianGames2018
— Narendra Modi (@narendramodi) August 18, 2018