Asian Games 2018 Live : आयोजनासाठी युवा पिढीही सरसारवली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 07:17 PM2018-08-19T19:17:42+5:302018-08-19T19:17:58+5:30

शियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामध्ये मदत व्हावी या हेतूने तब्बल 12,900 स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला आहे. हे स्वयंसेवक  इंडोनेशियाच्या विविध भागांमधून जकार्ता-पालेमबंग येथे आले आहेत. यांपैकी 8,100 स्वयंसेवक 17 ते 23 वयोगातील आहेत,

Asian Games 2018 Live: The young generation also contributed to the planning | Asian Games 2018 Live : आयोजनासाठी युवा पिढीही सरसारवली

Asian Games 2018 Live : आयोजनासाठी युवा पिढीही सरसारवली

googlenewsNext
ठळक मुद्देसुमात्रा येथे काही महिन्यापूर्वीच आतंकवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती, त्यामुळे आयोजकांनी सुरक्षा खूप वाढवली आहे.

जकार्ता : आपल्या देशात एखादा मोठा इव्हेंट होणार आहे, हे कळल्यावर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी इंडोनेशियाची युवा पीढी सरसावली आहे. आपल्या देशाला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामध्ये मदत व्हावी या हेतूने तब्बल 12,900 स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला आहे. हे स्वयंसेवक  इंडोनेशियाच्या विविध भागांमधून जकार्ता-पालेमबंग येथे आले आहेत. यांपैकी 8,100 स्वयंसेवक 17 ते 23 वयोगातील आहेत, बाकीचे स्वयंसेवक २३ ते ४० या वयोगटात आहे. ६० टक्के स्वयंसेवक मुली आहेत. स्टेडियम व्यतिरिक्त हे स्वयंसेवक एअरपोर्ट, बस स्टॉप सारख्या सार्वजनिक ठिकाणी सुद्धा उपस्थित आहे.

पोलिसांची तारेवरची कसरत 
 आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संपूर्ण जकार्तामध्ये ४०,००० पेक्षा जास्त सुरक्षारक्षक तैनात केले आहे. उदघाट्न समारंभच्यावेळी ८५०० पोलीस गेलोरो बंग करणो स्टेडियम जवळ होते. ३५० नवीन तंत्रज्ञानचे सीसी टीवी कॅमेरा सुद्धा शहरात बसवण्यात आले आहे. क्रीडाग्रामजवळ सुद्धा ५०० पेक्षा जास्त पोलीस २४ तास निगराणी करत आहेत. सुमात्रा येथे काही महिन्यापूर्वीच आतंकवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती, त्यामुळे आयोजकांनी सुरक्षा खूप वाढवली आहे.

Web Title: Asian Games 2018 Live: The young generation also contributed to the planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.