Asian Games 2018: ऐकावे ते नवलच... जन्म झालेल्या बाळाचे नाव ठेवलं एशियन गेम्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 04:08 PM2018-08-22T16:08:44+5:302018-08-22T16:10:58+5:30
इंडोनेशियातील एका खेळवेड्या जोडप्याने जन्म आलेल्या बाळाचे नाव एशियन गेम्स वर ठेवले आहे.
जकार्ता : सध्या सगळीकडे स्वर आहे तो आशियाई क्रीडा स्पर्धेचा. हा ज्वर एवढा रक्तात भिनलेला आहे की, एका जोडप्याने आपल्या बाळाचे एशियन गेम्स असेच नाव ठेवले आहे.
ही गोष्ट आहे ती इंडोनेशियामधली. आशियाई स्पर्धही तिथेच सुरु आहेत. इंडोनेशियातील एका खेळवेड्या जोडप्याने जन्म आलेल्या बाळाचे नाव एशियन गेम्स वर ठेवले आहे. उदघाटन समारंभच्या काही तास अगोदर जन्म दिलेल्या मुलीचे "अबिदा ऍशियन गेम्स" असे ठेवले आहे.
आशियाई स्पर्धा इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबंग येथे सुरु आहेत. येथील पालेमबंग शहरात यार्डनिया व व्हेरा डेन्नी हे जोडपे राहते. या जोडप्याने आपल्या बाळाच्या नावात एशियन गेम्स का वापरले, असा पश्न तुम्हालाही पडला असेल. याबाबत यार्डनिया यांनी सांगितले की, “ एशियन गेम्स ही दुर्मिळ स्पर्धा आहे, १९६२ नंतर इंडोनेशिया मध्ये होत आहे. त्यामुळे कुटूंबाचे नाव लावण्यापेक्षा एशियन गेम्स हे नाव आम्हाला जास्त आवडलं. “
इंडोनेशिया मध्ये बॅडमिंटन खूप प्रसिद्ध आहे आणि तिने बॅडमिंटनपटू होऊन एक दिवस आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.