Asian Games 2018: द्युती चंदला तीन कोटींची लॉटरी, ओडिशाकडून बक्षीस जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 04:11 PM2018-08-30T16:11:13+5:302018-08-30T16:11:45+5:30

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत 100 व 200 मीटर शर्यतीत भारताला रौप्यपदक जिंकून देणाऱ्या धावपटू द्युती चंदला तीन कोटींची लॉटरी लागली आहे.

Asian Games 2018: Odisha Chief Minister Naveen Patnaik announces additional cash reward of Rs 1.5 crore for sprinter Dutee Chand | Asian Games 2018: द्युती चंदला तीन कोटींची लॉटरी, ओडिशाकडून बक्षीस जाहीर

Asian Games 2018: द्युती चंदला तीन कोटींची लॉटरी, ओडिशाकडून बक्षीस जाहीर

Next

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः आशियाई स्पर्धेत 100 व 200 मीटर शर्यतीत भारताला रौप्यपदक जिंकून देणाऱ्या धावपटू द्युती चंदला तीन कोटींची लॉटरी लागली आहे. आोडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गुरुवारी द्युतीला 1.5 कोटींची बक्षीस रक्कम जाहीर केली. तत्पूर्वी 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकणाऱ्या द्युतीला 1.5 कोटी बक्षीस रकमेची घोषणा करण्यात आली होती. 



 द्युतीने महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये द्युतीने दुसरा क्रमांक पटकावला आणि देशाला रौप्यपदक मिळवून दिले. द्युतीने 200 मी. हे अंतर 23.20 सेकंदांमध्ये पूर्ण केले. या शर्यतीमध्ये बहारीनच्या ओडीआँगने हे अंतर 22.96 सेकंदांमध्ये पूर्ण करत सुवर्णपदक पटकावले.


तत्पूर्वी, द्युतीने रविवारी  महिलांच्या १०० मीटर दौड स्पर्धेत रौप्यपदक पटकावत या स्पर्धेत २० वर्षांत भारताला प्रथमच पदक मिळवून दिले. सातव्या क्रमांकाच्या लेनमध्ये धावताना द्युतीने ११.३२ सेकंदाची वेळ नोंदवली. तिचा राष्ट्रीय विक्रम ११.२९ सेकंद वेळेचा आहे. बहरिनच्या ओडियोंग एडिडियोंगने ११.३० सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले, तर चीनची वेई योंगलीने ११.३३ सेकंद वेळेसह कांस्यपदकाचा मान मिळवला.

Web Title: Asian Games 2018: Odisha Chief Minister Naveen Patnaik announces additional cash reward of Rs 1.5 crore for sprinter Dutee Chand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.