Asian Games 2018: पदक विजेत्या खेळाडूंना इकोनॉमी, तर अधिकाऱ्यांना बिझनेस क्लासने प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 09:22 AM2018-09-05T09:22:05+5:302018-09-05T09:22:22+5:30
Asian Games 2018:18व्या आशियाई स्पर्धेत भारताने 69 पदकांची कमाई केली. आत्तापर्यंतच्या आशियाई स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आणि खेळाडूंनी अनेक विक्रमही मोडले.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः 18व्या आशियाई स्पर्धेत भारताने 69 पदकांची कमाई केली. आत्तापर्यंतच्या आशियाई स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आणि खेळाडूंनी अनेक विक्रमही मोडले. या स्पर्धेतील अनेक खेळाडू हे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इथवर पोहोचले आहेत. त्यांच्या पदकाचे त्या दिवसापुरते तोंडभरून कौतुकही झाले. भारतीय पथकासोबत गेलेल्या अधिकाऱ्यांनी खेळाडूंसोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर चमकुगिरीही केली. पण, मायदेशी परतत असताना या पदक विजेत्या खेळाडूंना नेहमीचा अनुभव आला.
At the felicitation ceremony of our #ASIANGAMES2018 Stars! Such an honour to be with these Champions who made India's best ever haul at #AsianGames possible with their hard work, talent & grit!
— Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) September 4, 2018
A salute to Indian sports and our incredible sportsmen! #KheloIndiapic.twitter.com/OFxohJEtVB
खेळाडूंना इकोनॉमी क्लासमधून प्रवास करावा लागला, तर अधिकाऱ्यांनी बिझनेस क्लासमधून प्रवास केला. भारतीय पथकाचे उपप्रमुख आर के सचेती यांनी मायदेशी परतताना बिझनेस क्लासमधून प्रवास केला आणि त्याच वेळी खेळाडू मात्र इकोनॉमी क्लासमध्ये होते. ''आमच्यामुळे ते इथे आहेत. त्याशिवाय त्यांना येण्याचा दुसरा पर्याय नाही. इकोनॉमी क्लासमधून प्रवास करण्यात काहीच त्रास नाही, परंतु अधिकाऱ्यांना अशी विशेष वागणुक मिळणार असेल, तर ती आम्हालाही मिळायला हवी,''असे मत व्हॉलिबॉल संघाच्या एका खेळाडूने व्यक्त केले. भारतीय व्हॉलिबॉलल संघाने जकार्ता ते सिंगापूर प्रवास SQ 967 या विमानाने केला.
हा प्रवास मी स्वखर्चाने केला असल्याचे सांगत सचेती यांनी आपला बचाव केला. '' माझेही इकोनॉमी क्लासचे तिकीट होते, परंतु मी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून बिझनेस क्लासचे तिकीट घेतले,'' असे सचेती यांनी सांगितले. केंद्रिय क्रीडा मंत्रालयानेही सचेती यांच्या वर्तनाचा निषेध केला. मात्र, भारतीय ऑलिम्पिक असोसिएथनने सचेती स्वखर्चाने गेल्याचे स्पष्ट केले.