Asian Games 2018: संजीव राजपूतचे 'सुवर्ण' स्वप्न अधुरे!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 01:34 PM2018-08-21T13:34:16+5:302018-08-21T13:34:36+5:30
Asian Games 2018: अखेरपर्यंत चिवट खेळ करूनही भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
मुंबई - अखेरपर्यंत चिवट खेळ करूनही भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. संजीवला 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये अवघ्या काही गुणांच्या फरकाने सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. चौथ्यांदा आशियाई स्पर्धेत सहभागी झालेला संजीव हा भारतीय चमूतील वयस्कर नेमबाज आहे. 37 वर्षीय संजीवने 452.7 गुणांची कमाई करताना रौप्यपदक जिंकले. चीनच्या हुई झिचेंगने 453.3 गुणांसह सुवर्णपदक, तर जपानच्या मात्सुमोटो टाकायुकीने ( 441.4) कांस्यपदक जिंकले.
A silver lining for #TeamIndia at the #AsianGames2018
— Team India (@ioaindia) August 21, 2018
India's #SanjeevRajput claims a Silver medal 🥈for the country as he completed his campaign at the Men's 50m Rifle 3 Positions #Shooting event at the JSC - Shooting Range in Palembang!#Congratulations@sanjeevrajput1 👏🇮🇳 pic.twitter.com/CjGoNS3QnE
कारकिर्दीतली अखेरची आशियाई स्पर्धा खेळणाऱ्या संजीवला यंदा सुवर्णपदकाची अपेक्षा होती. त्याने त्यादृष्टीने खेळही केला, परंतु अखेरच्या काही प्रयत्नांत त्याला अपयश आले. संजीवने 10 मीटर एअर रायफल सांघिक गटात कांस्यपदक जिंकले होते. त्यापूर्वी त्याने 2006च्या आशियाई स्पर्धेत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक गटात कांस्य, तर 2010 मध्ये 10 मीटर एअर रायफल सांघिक गटात रौप्यपदक जिंकले आहे.