Asian Games 2018: shocking... आशियाई स्पर्धेच्या तिकीटांची होते आहे ब्लॅक मार्केटींग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 04:21 PM2018-08-23T16:21:18+5:302018-08-23T16:22:18+5:30

Asian Games 2018 ticket इंडोनेशियाच्या नागरिकांनी स्टेडियम्सच्या बाहेर तब्बल 3 तास तिकीटांसाठी रांग लावली, पण त्यांना काही तिकीट मिळू शकले नाही. त्यामुळे स्टेडियम्सच्या बाहेर सुरु झाली ती तिकीटांची ब्लॅक मार्केटींग.

Asian Games 2018: shocking ... Asian competition tickets are Black marketing | Asian Games 2018: shocking... आशियाई स्पर्धेच्या तिकीटांची होते आहे ब्लॅक मार्केटींग

Asian Games 2018: shocking... आशियाई स्पर्धेच्या तिकीटांची होते आहे ब्लॅक मार्केटींग

Next
ठळक मुद्देबऱ्याच नागरिकांना यावेळी जवळपास 3 तास रांग लावूनही तिकीटी मिळू शकल्या नाहीत. 

जकार्ता : आशियाई स्पर्धेत यजमान इंडोनेशियाची कामगिरी नेत्रदीपक होत आहे. आपल्या देशातील खेळाडूंची कामगिरी याचि देही, याची डोळा पाहण्यासाठी इंडोनेशियाच्या नागरिकांनी स्टेडियम्सच्या बाहेर एकच गर्दी केली होती. त्यावेळी त्यांनी तब्बल 3 तास तिकीटांसाठी रांग लावली, पण त्यांना काही तिकीट मिळू शकले नाही. त्यामुळे स्टेडियम्सच्या बाहेर सुरु झाली ती तिकीटांची ब्लॅक मार्केटींग.

इंडोनेशियाच्या नागरिकांनी सुरुवातीला ऑनलाईन तिकीट मिळते का, ते पाहिले. पण या ऑनलाईन वेबसाईट हँग झाली होती. त्यामुळे नागरिकांनी थेट स्टेडियम गाठले आणि तिकीटांसाठी रांग लावली. बऱ्याच नागरिकांना यावेळी जवळपास 3 तास रांग लावूनही तिकीटी मिळू शकल्या नाहीत. 

इंडोनेशिया बऱ्याच चाहत्यांना पुरुष व महिला बॅडमिंटन सांघिक अंतिम सामना बघायचा होता. काही तिकीट खरीदी केलेल्या लोकांनी या संधीचा फायदा उचलून अधिक मूल्यात तिकीट विक्री सुद्धा केली. स्पर्धा बघायला दुसऱ्या आशिया खंडातील बरेच देशाचे चाहते इथे आले आहे.

यावेळी अहंग या इंडोनेशियाच्या 67 वर्षीय चाहत्याने सांगितले की, "मी सकाळी 8:00 वाजता रांगेत उभा राहिलो. मला आणि माझ्या पत्नीसाठी बॅडमिंटनची तिकिटे खरेदी करायची होते.आम्हाला बॅडमिंटनची तिकीट संपली आहे, अशी कल्पना सुद्धा दिली नाही. जेव्हा माझा नंबर आला तेव्हा मला हे समजले. मला खूप मनस्ताप झाला."

Web Title: Asian Games 2018: shocking ... Asian competition tickets are Black marketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.