Asian Games 2018: नेमबाज शार्दुल विहानला सुवर्णपदकाची हुलकावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 03:00 PM2018-08-23T15:00:39+5:302018-08-23T15:01:13+5:30
भारताचा युवा नेमबाज शार्दुल विहानला पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या शिन ह्यूनहू याने विहानला पिछाडीवर टाकत सुवर्णपदक पटकावले.
जकार्ता : भारताचा युवा नेमबाज शार्दुल विहानला पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या शिन ह्यूनहू याने विहानला पिछाडीवर टाकत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे विहानला यावेळी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
A 15-year-old wonder boy won a Silver medal in the Men's Double Trap #Shooting event today! The boy was #ShardulVihan who won #TeamIndia it's 4th Silver medal at #AsianGames2018! #WellDone@ShardulVihan 🇮🇳👏👏 The country is mighty proud of your achievement!#IAmTeamIndiapic.twitter.com/uy8K8s4tzA
— Team India (@ioaindia) August 23, 2018
स्पर्धेच्या अंतिम फेरीत विहान सुरुवातीपासून आघाडीवर होता. पण जेव्हा फक्त तीन स्पर्धक उरले तेव्हा विहानला शिनने कडवे आव्हान दिले. सुवर्णपदकासाठी जेव्हा स्पर्धा सुरु झाली तेव्हा शिननने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि ती कायम ठेवली. यावेळी विहानला त्याच्याकडून झालेल्या चुकांचा फटका बसला. शिनने आघाडी घेतल्यावर विहानला त्याची मक्तेदारी मोडणे जमले नाही, तशी संधी शिनने दिली नाही. त्यामुळे विहानला अखेर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आणि भारताचे एक सुवर्णपदक हुकले.