Asian Games 2018 : भारतीय महिला तिरंदाजांना रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 11:34 AM2018-08-28T11:34:53+5:302018-08-28T12:05:50+5:30
Asian Games 2018 : भारतीय महिला तिरंदाजी संघाची क्रांती. आशियाई स्पर्धेत महिलांच्या कम्पाऊंड सांघिक गटात रौप्यपदकाची कमाई केली.
जकार्ता, आशियाई स्पर्धाः भारतीय महिला तिरंदाजी संघाची क्रांती. आशियाई स्पर्धेत महिलांच्या कम्पाऊंड सांघिक गटात रौप्यपदकाची कमाई केली. मुस्कान किरार, मधुमिता कुमारी आणि ज्योती सुरेशा वेन्नम यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला अंतिम लढतीत दक्षिण कोरियाकडून हार पत्करावी लागली. कोरियाने 231-228 अशा फरकाने विजय मिळवला.
चुरशीच्या या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या सेटमध्ये 59-57 अशी आघाडी घेत दणक्यात सुरूवात केली, परंतु कोरियन खेळाडूंनी दुसऱ्या सेटमध्ये कमबॅक केले. त्यांनी हा सेट 58-56 असा घेतला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही संघांनी चुरशीचा खेळ केला आणि हा सेट 58-58 असा सुटला. अखेरच्या सेटमध्ये भारतीय खेळाडूंकडून चुका झाल्या आणि त्या कोरियाच्या पथ्यावर पडल्या. 2014मध्ये भारतीय महिलांना कम्पाऊंड गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
Breaking News: Silver Medal for India as they go down to South Korea 228-231 in Compound Women's Team Final
— India@AsianGames2018 (@India_AllSports) August 28, 2018
42nd Medal for India #AsianGames2018pic.twitter.com/A5LELa8uPD