Asian Games 2018: भारतीय महिला स्क्वॉश संघाला रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 03:08 PM2018-09-01T15:08:20+5:302018-09-01T15:16:25+5:30
Asian Games 2018: गतविजेत्या मलेशियाला पराभवाची चव चाखवून अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश करणाऱ्या भारतीय महिला स्क्वॉश संघाला आशियाई स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः गतविजेत्या मलेशियाला पराभवाची चव चाखवून अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश करणाऱ्या भारतीय महिला स्क्वॉश संघाला आशियाई स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत हाँगकाँग संघने 2-0 अशा फरकाने भारतीय संघाला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले.
#AsianGames2018 : India's women's squash team wins silver after losing to Hong Kong in the final pic.twitter.com/EFdpIc8SUm
— ANI (@ANI) September 1, 2018
दीपिका पल्लीकल, जोश्ना चिनप्पा, तन्वी खन्ना आणि सुनन्या कुरूविल्ला यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाची मदार अनुभवी दीपिका आणि जोश्ना यांच्यावर होती. परंतु, त्यांना पराभव पत्करावा लागला.
News Flash: Squash | India go down to Hong Kong 0-2 in Women's Team Event Final as Joshna Chinappa loses the 2nd Singles match
— India@AsianGames2018 (@India_AllSports) September 1, 2018
Silver for India
Well done girls
PS: Won Silver in 2014 edition also #AsianGames2018pic.twitter.com/qKkpJVcQlG
दीपिका आणि जोश्ना यांनी महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले आहे. त्यांना उपांत्य फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत सौरव घोषालने विक्रमी कांस्यपदक जिंकले. 2006 ते 2018 या कालावधीत चारही आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय स्क्वॉशपटू आहे.