Asian Games 2018: भारताच्या घोडेस्वारांची रौप्यक्रांती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 01:00 PM2018-08-26T13:00:06+5:302018-08-26T13:14:16+5:30
Asian Games 2018: फौआद मिर्झाने वैयक्तिक गटात, तर राकेश कुमार, आशिष मलिक, जितेंदर सिंग व मिर्झा यांनी सांघिक गटात भारताला अश्वशर्यतीत रौप्यपदकं जिंकून दिली.
जकार्ता - फौआद मिर्झाने वैयक्तिक गटात, तर राकेश कुमार, आशिष मलिक, जितेंदर सिंग व मिर्झा यांनी सांघिक गटात भारताला अश्वशर्यतीत रौप्यपदकं जिंकून दिली. आशियाई स्पर्धेत तब्बल 36 वर्षांनंतर भारतीय घोडेस्वाराने वैयक्तिक गटात पदक जिंकण्याचा पराक्रम केला. घोडेस्वार फौआद मिर्झाने रौप्यपदक जिंकून दिले. त्याने 26.40 गुणांची कमाई करताना ही विक्रमी कामगिरी केली. 1982नंतर घोडेस्वाराने पटकावलेले हे पहिलेच पदक ठरले.
Our excellent Equestrian team has won us a SILVER in the Equestrian Eventing Team at the #AsianGames2018!
— Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) August 26, 2018
Brilliant performance by team members Mirza, Rakesh, Ashish and Jitender. Well done! #KheloIndia#IndiaAtAsianGames@asiangames2018
सांघिक गटातही भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाने 121.30 गुण मिळवले. जपान व थायलंड यांनी अनुक्रमे सुवर्ण व कांस्यपदक जिंकले.
भारताच्या रघुवीर सिंग यांनी 1982च्या नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत वैयक्तिक गटातील दोन सुवर्णपदकं जिंकली होती. त्यानंतर वैयक्तिक गटात पदक जिंकणारा मिर्झा हा पहिलाच भारतीय ठरला. भारताने अश्वशर्यतीत एकूण तीन सुवर्ण, 3 रौप्य आणि 6 कांस्य अशी 12 पदकं जिंकली आहेत. यातील सर्वाधिक दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदकं ही 1982च्या आशियाई स्पर्धेत जिंकली आहेत.