Asian Games 2018: म्हणून द्युतीने मिळवले घवघवीत यश, प्रशिक्षकाने सांगितली राज की बात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 10:53 AM2018-08-31T10:53:40+5:302018-08-31T10:54:11+5:30
Asian games 2018: चार वर्षांच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमबॅक करणाऱ्या भारताच्या द्युती चंदने आशियाई स्पर्धेत पदकाचा धमाका उडवून दिला.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः चार वर्षांच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमबॅक करणाऱ्या भारताच्या द्युती चंदने आशियाई स्पर्धेत पदकाचा धमाका उडवून दिला. तिने 100 व 200 मीटर शर्यतीत भारताला रौप्यपदक जिंकून दिले. पी. टी. उषा यांच्यानंतर एकाच आशियाई स्पर्धेत 100 व 200 मीटर शर्यतीत पदक जिंकण्याचा मान द्युतीने पटकावला. तिच्या या यशामागचं रहस्य प्रशिक्षक एन रमेश यांनी सांगितले.
द्युतीने 11.32 सेकंदाच्या विक्रमासह 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक नावावर केले. 200 मीटर शर्यत पूर्ण करण्यासाठी तिने 23.20 सेकंदाची वेळ घेतली. उंचीने कमी असूनही द्युतीने केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे. प्रशिक्षक रमेश यांनी सांगितले की,"द्युनी आपल्या कमी उंचीची उणीव पायातील वेगाने भरून काढली. तसेच स्पीड रब्बरच्या ट्रेनिंगचाही तिला फायला झाला.''
आोडिशाच्या द्युतीची उंची 5 फुट 3 इंच आहे. तिने 20 वर्षांनंतर भारताला 100 मीटर शर्यतीत पदक जिंकून दिले.
SILVER in women’s 200m race goes to Dutee Chand!
— SAIMedia (@Media_SAI) August 29, 2018
With a timing of 23.20s, she was terrific!
Many congratulations to @DuteeChand, an ex-trainee of #SAI COE,#Patiala on her 2nd medal in #AsianGames2018!🥈#IndiaAtAsianGames@afiindia#Athletics#ProudIndia@iaaforg#KheloIndia🇮🇳 pic.twitter.com/lFhrRPSLSF
रमेश यांनी सांगितले की,'तिच्या पायांमध्ये प्रचंड गती आहे. त्यामुळेच आम्ही पहिल्या 30 ते 40 मीटरवर अधिक मेहनत घेतली. सराव सत्रात स्पीड रबरचा वापर करुन द्युतीकडून मेहनत करून घेतली.'
Feel so happy for N Ramesh Kumar Sir who has contributed immensely in helping Dutee Chand with her training. I personally had the fortune of training under Ramesh Sir as well. Kudos to all the staff who work with players & make a lot of sacrifices in helping dreams become reality pic.twitter.com/Lw01mkBeL4
— VVS Laxman (@VVSLaxman281) August 30, 2018
रबर स्पीड म्हणजे काय?
या प्रक्रियेत गुडघ्यांच्या बरोबर वरती बँड घातला जातो. त्याने धावण्याच्या गतीवर अंकुश येतो आणि त्यामुळे मांडीच्या स्नायूंची ताकद वाढण्यात मदत मिळते.