Asian Games 2018: ८ व्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले, आईने काबाडकष्ट करून घडवले; 'धाकड' धारुणची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 09:04 AM2018-08-28T09:04:45+5:302018-08-28T10:43:28+5:30
Asian Games 2018: भारताच्या धारुण अय्यासामीने आशियाई स्पर्धेत ४०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले. या पदकानंतर तरी नोकरी मिळेल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारताच्या धारुण अय्यासामीने आशियाई स्पर्धेत ४०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले. या पदकानंतर तरी नोकरी मिळेल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे. वडिलांच्या निधनानंतर आईने काबाडकष्ट करत एकटीने त्याला वाढवले आणि आता तिला विश्रांती मिळावी म्हणून धारुण नोकरीची आस लावून बसला आहे.
Dharun Ayyasami BREAKS NATIONAL record #India, provides #India one more silver medal- Men's 400m H- 48.96s at the #AsianGames2018#EnergyofAsia First Indian to run a 400m H under 49secs.
— Athletics Federation of India (@afiindia) August 27, 2018
BRAVOOO Dharun
PC- @rahuldpawar@ioaindia@IndiaSports@Media_SAI@Ra_THORe@asianathleticspic.twitter.com/MtQW5n0Q8y
" मी आठ वर्षांचा असताना वडिलांचे निधन झाले. आईने माझ्या संगोपनासाठी खूप काबाडकष्ट केले. अनेक त्याग केले. हे पदक तिच्यासाठी आहे. ती शिक्षिका आहे आणि अजूनही महिन्याला तिला १४००० पगार मिळतो," असे २१ वर्षीय धारुणने सांगितले. मार्च महिन्यात झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत धारुणने ४९.४५ सेकंदाची वेळ नोंदवली होती. आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी तो पोलंड आणि चेक प्रजासत्ताक येथे गेला होता.
तामिळनाडूच्या तुरुपूर येथील धारुणला या पदकानंतर नोकरीची आस लागली आहे. धारुणने ४८.९६ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. तो म्हणाल," मला फक्त शर्यत पूर्ण करून पदक जिंकायचे होते. त्यावेळी माझ्यासाठी इतर सर्व गोष्टी शूद्र होत्या. राष्ट्रीय विक्रम केल्याचाही आनंद आहे."