Asian Games 2018: कोरियाला जमले ते भारत-पाकिस्तान या देशांना जमेल का?
By स्वदेश घाणेकर | Published: August 18, 2018 06:53 PM2018-08-18T18:53:14+5:302018-08-18T19:00:40+5:30
Asian Games 2018: खेळाला जात-धर्म, भाषा, वर्ण नसते... सर्व हेवेदावे विसरून खेळ सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य करत असतो आणि याची प्रचिती 18व्या आशियाई स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्यात पुन्हा आली.
खेळाला जात-धर्म, भाषा, वर्ण नसते... सर्व हेवेदावे विसरून खेळ सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य करत असतो आणि याची प्रचिती 18व्या आशियाई स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्यात पुन्हा आली. दक्षिण आणि उत्तर कोरिया या दोन शेजाऱ्यांमधील वाद जगजाहीर आहे, परंतु आशियाई स्पर्धेच्या निमित्ताने हे दोन देश एकत्र आले. उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जाँग-उन आणि दक्षिण कोरियाचे मून जी-इन हे एकेकाळचे कट्टर वैरी सोहळ्याला एकमेकांच्या गळ्यातगळे घालताना दिसले.
( Asian Games 2018 Opening Ceremony: संस्कृतीचे दर्शन अन् इतिहासाला उजाळा...)
आशियाई स्पर्धेत प्रथमच हे दोन्ही देशांच्या खेळाडूंनी एकत्रित पथसंचलन केले. दुसऱ्या महायुद्धानंतर कोरियाची उत्तर व दक्षिण अशी दोन देशांमध्ये विभागणी झाली. 25 जून 1950 मध्ये या दोन देशामंध्ये युद्धही झाले. 2010 पासून दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये सुधारण्याचा प्रयत्न सुरू झाले. पण, काही कारणास्तव त्यातही राजकीय विरोध होत होता, मात्र 2018च्या आशियाई स्पर्धेच्या निमित्ताने या कट्टर वैरींना एकत्र आणले. खेळाने दोन देशांना एकत्र आणल्याची ही पहिलीच वेळ असावी.
Korea didnt hold any flag.. they even didnt hold their national flag #AsianGames2018pic.twitter.com/pMMwmtHFh4
— ㅈ ㅎ ㅣ (@woonbyeol) August 18, 2018
सोहळ्याच्या पथकसंचलन सोहळ्यात दोन्ही देशांचे खेळाडू स्टेडियमवर आले, त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला. खेळाडूंनी कोणत्याही देशाचा ध्वज हातात घेतला नव्हता. पण, प्रत्येक खेळाडूंनी एकमेकांच्या हातात हात घालून संपूर्ण जगाला एकतेचा संदेश दिला. या स्पर्धेत दोन्ही देशांनी बास्केटबॉल, रोविंग व कॅनोइंग खेळात एकत्रित संघ उतरवला आहे. उत्तर आणि दक्षिण कोरियाने दिलेला हा एकजुटीचा संदेश जगाला नवी शिकवण देणारा आहे, पण भारतीय म्हणून मनात एक प्रश्न घर करत आहे. जे कोरियन देशांना जमले ते भारत आणि पाकिस्तान यांना कधी जमेल का? भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय नेतेमंडळी तसा पुढाकार घेतील का? त्याही पलिकडे दोन्ही देशांतील जनता त्याचा स्वीकार करतील का?
So Proud 😭😭😭 #AsianGames2018#EnergyofAsia#OpeningCeremonyAsianGames2018pic.twitter.com/l69SuZFHtZ
— ✨'ㅅ' (@mybaekzone) August 18, 2018