Asian Games 2018: साधी माणसं जेव्हा जग जिंकतात, स्वप्नाच्या आईचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 09:50 AM2018-09-03T09:50:07+5:302018-09-03T09:54:33+5:30
कोलकाता - आशियाई स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकवून देणाऱ्या स्वप्ना बर्मनच्या आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत स्वप्नाच्या विजयाचा क्षण टिपण्यात आला आहे. मात्र, स्वप्नाने सोनेरी झेप घेतल्यानंतर जकार्तामध्ये तिरंगा फडकविताना तिच्या कुटुंबीयांचा आनंद या व्हिडिओत टिपला आहे. स्वप्नाने तिंरगाच उंचावताच तिच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले आहेत.
पश्चिम बंगाच्या जैलपुरी येथील एका रिक्षावाल्याची मुलगी असलेल्या स्वप्नाने आपल्या अलौकिक कामगिरीच्या जोरावर जग जिंकले आहे. ज्या खेळाची साधी कल्पनाही कोट्यवधी भारतीयांना नव्हती. त्या हेप्टॉथ्लॉन स्पर्धेत स्वप्ना बर्मनने सुवर्णपदक जिंकले. कोट्यवधी भारतीयांना यावेळी आनंद झाला होता. पण, स्वप्नाच्या कुटुंबीयांसाठी हा सोनेरी क्षण एका स्वप्नासारखाच होता. त्यामुळे या आशियाई विजयाचे सेलिब्रेशन करताना स्वप्नाच्या आईने चक्क टाहो फोडला. तर अंथरुणात खिळेलेल्या तिच्या रिक्षावाल्या वडिलांनाही अश्रू अनावर झाले. स्वप्नाचे हे यश पत्र्याच्या घरात एका फोर्टेबल रंगीत टीव्हीवर पाहणाऱ्या तिच्या कुटुंबीयांसाठी एक सुखद धक्का होता. त्यामुळेच, तिच्या आईने चक्क टाहो फोडत घरातील देव्हाऱ्यावर लोटांगण घेतल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. सर्वसाधारण माणसे जेव्हा जग जिंकताता, तेव्हा तो आनंद गगनातही मावत नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वप्नाच्या कुटुंबीयांचा व्हायरल होणार हा व्हिडीओ आहे. स्वप्नाच्या हा विजयाचा क्षण स्वप्नासाठी, तिच्या कुटुंबीयांसाठी आणि देशवासियांसाठी एक भावूक क्षण होता.
पाहा व्हिडिओ -