Asian Games 2018: कांस्य पदक जिंकून आम्ही इतिहास रचला - हीना देवरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 05:36 PM2018-08-27T17:36:38+5:302018-08-27T17:37:40+5:30

पदक जिंकण्याचा आनंद आहे पण आमची अपेक्षा सुवर्ण किंवा रौप्य पदकाची होती, असे हिना म्हणाल्या.

Asian Games 2018: by winning the bronze medal We made history - Heena Deora | Asian Games 2018: कांस्य पदक जिंकून आम्ही इतिहास रचला - हीना देवरा

Asian Games 2018: कांस्य पदक जिंकून आम्ही इतिहास रचला - हीना देवरा

Next
ठळक मुद्देब्रिज या खेळाचा पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत समाविष्ट करण्यात आले आहे

जकार्ता : ब्रिज या खेळाचा पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत समाविष्ट करण्यात आले आहे.  कांस्य पदक जिंकून आम्ही इतिहास रचत भारताचा गौरव वाढविला आहे  याचा अभिमान वाटतो. असे वक्तव्य केले आहे ते ब्रिज या खेळात कांस्यपदक पटकावणाऱ्या हीना देवरा यांनी.

हीना पुढे म्हणाल्या की, " माझ्यासहीत संघातील इतर खेळाडू किरण नाडर, हिमानी खंडेलवाल, बाकिराजू सत्यनारायण, गोपीनाथ मन्ना, राजीव खंडेलवाल यांना पदक जिंकण्याचा आनंद आहे पण आमची अपेक्षा सुवर्ण किंवा रौप्य पदकाची होती. जापान, चीन, इंडोनेशिया यांच्या सारख्या बलाढ्य संघाला हरवून उपांत्य फेरी गाठली. ब्रिज मध्ये अगदी छोट्या चुकी मुळे सामना हरला सुद्धा जातो, उपांत्य फेरीत थायलंड विरुद्ध ४ पेक्षाही कमी पॉईंट्सने आम्ही हरलो ही खंत आहे. "

Web Title: Asian Games 2018: by winning the bronze medal We made history - Heena Deora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.