Asian Games 2018: कुस्तीपटू हरप्रीत सिंग कांस्यपदकासाठी लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 01:45 PM2018-08-22T13:45:33+5:302018-08-22T13:45:51+5:30
हरप्रीतने 87 किलो वजनीगटामध्ये दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत मजल मारली आहे.
जकार्ता : भारताचा कुस्तीपटू हरप्रीत सिंगला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले, त्यामुळे आता त्याला कांस्यपदकासाठी सामना खेळावा लागेल. ग्रीको रोमन प्रकारात पदक निश्चित केले आहे. हरप्रीतने 87 किलो वजनीगटामध्ये दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत मजल मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या 87 किलो वजनीगटामध्ये हरप्रीचने जपानच्या मासाटो सुमीवर 8-0 असा दणदणीत विजय मिळवला. हरप्रीतने उपांत्य फेरीत मजल मारली असून त्यांचे किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे.
On a winning streak, #HarpreetSingh of #TeamIndia beat #MasatoSumi of Japan by 8-0 in Quarter-finals. A straight win by Technical Superiority, Harpreet progresses into the Semi-final round of the Men's Greco-Roman 87 kg #Wrestling where he will face Rustam A. of Uzbekistan. pic.twitter.com/i6ucyKr895
— Team India (@ioaindia) August 22, 2018
उपांत्य फेरीत हरप्रीतचा पराभव
#TeamIndia at the #AsianGames2018#HarpreetSingh bowed down to #RustamA. of Uzbekistan, as the latter defeated the Indian by 10-0 in a quick win by Technical Superiority in the Men's Greco-Roman 87 kg #Wrestling bout! Harpreet will now wrestle for a Bronze medal win! #GoodLuckpic.twitter.com/xxfen9bZid
— Team India (@ioaindia) August 22, 2018