Asian Games 2018: सुवर्णपदक जिंकले, आता शर्यत 'खेल रत्न' पुरस्कारासाठी; बजरंग, विनेश आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 03:45 PM2018-08-30T15:45:02+5:302018-08-30T15:45:23+5:30
Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी भारताला कुस्तीतील सुवर्णपदक जिंकून दिले आणि देशातील सर्वोच्च राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठीच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे.
मुंबई - आशियाई स्पर्धेत बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी भारताला कुस्तीतील सुवर्णपदक जिंकून दिले आणि देशातील सर्वोच्च राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठीच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. दोन्ही कुस्तीपटूंनी रोमहर्षक विजय मिळवताना ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. आशियाई स्पर्धेपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही दोघांनी आपापल्या गटात सुवर्णपदकाची कमाई केली होती.
वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार बजरंगने खेल रत्न पुरस्कारासाठी अर्ज दाखल केला आहे, तर विनेशही लवकरच अर्ज करणार आहे. भारतीय कुस्ती महासंघातर्फे बजरंगने पुरस्कारासाठी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा 29 ऑगस्ट म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिनी पार पडतो, परंतु आशियाई स्पर्धेमुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
#मिली ☝ है ज़िन्दगी 👤 तो कोई #मकसद 😉 भी रखिये, ☺
— Bajrang Punia (@BajrangPunia) August 28, 2018
सिर्फ #साँस_लेकर 😌 वक़्त गवाना 😒 ही #ज़िन्दगी तो नहीं ।। 😌😏 pic.twitter.com/iBS9xcUr5d
''फेडरेशनतर्फे बजरंगने खेल रत्न पुरस्कारासाठी अर्ज दाखल केला आहे आणि राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेतील कामगिरीनंतर त्याला तो मिळायलाच हवा. विनेश या अर्ज करणार आहे की नाही, याबाबत माहिती नाही. परंतु मंत्रालयाकडून तिच्या नावाचा विचार केला जाईल," अशी माहिती महासंघाच्या पदाधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिली. ते पुढे म्हणाले,"बजरंग आणि विनेश दोघेही या पुरस्काराचे प्रबळ दावेदार आहेत."
बजरंगने 65 किलो वजनी गटात जपानच्या ताकातानी दैचीचा 11-8 असा पराभव केला. महिलांच्या 50 किलो वजनी गटात विनेशने जपानच्याच ईरीक युकीचा 6-2 असा पराभव केला. आशियाई स्पर्धेतील भारतीय महिला कुस्तीपटूने जिंकलेले हे पहिलेच सुवर्णपदक ठरले.
झंडा ऊँचा रहे हमारा 🇮🇳🙏 pic.twitter.com/R23iT1Plq6
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) August 24, 2018
हरयाणाच्या या दोन कुस्तीपटूंप्रमाणे भालाफेकपटू नीरज चोप्राही खेल रत्न पुरस्काराच्या शर्यतीत आहे. आशियाई स्पर्धेत ध्वजधारक असलेल्या नीरजनेही नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवताना भारताला भालाफेकीतील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. मिल्खा सिंग ( 1958) यांच्यानंतर आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. 25 सप्टेंबरला राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
What an incredible night 👌😊 A big thank you to everyone for the stream of good wishes, blessings, and support 🙏 झंडा ऊँचा रहे हमारा 🇮🇳 Jai Hind 🇮🇳💪 pic.twitter.com/l17kRG2kLu
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) August 28, 2018