अब की बार १०० पार! भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला, आशियाई स्पर्धेत पदकांचे शतक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 03:18 PM2023-10-06T15:18:31+5:302023-10-06T15:18:54+5:30

Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ गाजवलेली पाहायला मिळतेय... भारताने आतापर्यंत २१ सुवर्ण, ३३ रौप्य व ३७ कांस्य अशा एकूण ९१ पदकांसह तालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतलीय.

Asian Games 2023 : 100 medals for India; For the first time in Asian Games history, India will end the campaign with the medal count in triple digits  | अब की बार १०० पार! भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला, आशियाई स्पर्धेत पदकांचे शतक

अब की बार १०० पार! भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला, आशियाई स्पर्धेत पदकांचे शतक

googlenewsNext

Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ गाजवलेली पाहायला मिळतेय... भारताने आतापर्यंत २१ सुवर्ण, ३३ रौप्य व ३७ कांस्य अशा एकूण ९१ पदकांसह तालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतलीय. यंदा भारतीय खेळाडूंनी शंभरी पार असे लक्ष्य ठेऊन चीनमध्ये दाखल झाला होता आणि त्यांनी ते लक्ष्य पार केले आहे. आज सेपाकतक्राव या खेळात भारतीय महिला संघाने भारताला ऐतिहासिक कांस्यपदक जिंकून दिले. तिरंदाजीत आज अतून दास, तुषार शेळके आणि धिरज बोम्मादेवारा यांनी पुरुषांच्या रिकर्व्ह गटात रौप्यपदक जिंकले. त्यानंतर कुस्तीमध्ये महिलांच्या फ्रीस्टाइल ६२ किलो गटात कांस्यपदकावर कब्जा केला. सोनमने चीनची कुस्तीपटू लाँग जिया हिचा ७-५ असा पराभव करत हे पदक जिंकले आणि भारताने १०० पदकांचा टप्पा गाठला. सोनमने कांस्यपदक जिंकल्याने भारताने पदकतालिकेत एकूण ९१ पदके जिंकली आणि भारतीय खेळाडूंनी ९ पदकं निश्चित केली आहेत. त्यामुळे भारताच्या पदकाची संख्या १०० इतकी सहज पार होणार आहे.

Image
कोणत्या खेळांत पदक निश्चित...

  • कम्पाऊंड तिरंदाजी- अभिषेक वर्मा आणि ओजस देवतळे यांच्यात पुरुष गटाची फायनल होणार आहे म्हणजे भारताचा सुवर्ण व रौप्यपदक निश्चित आहेच. त्याशिवाय ज्योती सुरेखा वेन्नम ही महिलांच्या वैयक्तिक फायनलमध्ये खेळणार आहे
  • कबड्डी- भारताच्या पुरुष व महिला संघाने फायनलमध्ये प्रवेश करून भारतासाठी दोन पदकं निश्चित केली आहेत. 
  • ब्रिज - भारताच्या पुरुष संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे आणि त्यांना जेतेपदासाठी हाँगकाँगचा सामना करायचा आहे. 
  • पुरुष हॉकी - भारतीय पुरुष हॉकी संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि अंतिम सामन्यात आज ते जपानला भिडणार आहेत. या जेतेपदासह ते ऑलिम्पिक तिकीट पक्कं करण्यासाठी मैदानावर उतरतील.  
  • बॅडमिंटन - सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी किमान कांस्यपदक निश्चित केलं आहे. ते उपांत्य फेरीत मलेशियन खेळाडूंविरुद्ध खेळतील.  
  • पुरुष क्रिकेट - ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघाने फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि त्यांच्यासमोर अफगाणिस्तानचे आव्हान आहे.  
     

Web Title: Asian Games 2023 : 100 medals for India; For the first time in Asian Games history, India will end the campaign with the medal count in triple digits 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.