Asian Games 2023 : ७२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात जे कुणालाच नाही जमले ते अनू राणीने करून दाखवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 06:52 PM2023-10-03T18:52:49+5:302023-10-03T18:54:02+5:30
Asian Games 2023 : आज भालाफेकीत ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. अनू राणीने ( Annu Rani) महिलांच्या भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले.
Asian Games 2023 : भारताच्या पारुल चौधरीने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये आज ५००० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. पारुलने काल ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले होते आणि आज तिने सुवर्ण इतिहास लिहिला. पारुलने शेवटच्या ३० मीटरमध्ये जबरदस्त पुनरागमन करताना १५ मिनिटे १४. ७६ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक नावावर केले. आज भालाफेकीत ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. अनू राणीने ( Annu Rani) महिलांच्या भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले. २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या अनूने आज इतिहास लिहिला. ७२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात भालाफेकीत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. अनूने ६२.९२ मीटर लांब भालाफेकला.
🚀 𝗔𝗡𝗡𝗨 𝗠𝗔𝗞𝗘𝗦 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬! Annu Rani becomes the 𝐟𝐢𝐫𝐬𝐭 𝐈𝐧𝐝𝐢𝐚𝐧 𝐰𝐨𝐦𝐚𝐧 to win a 🥇 in the Javelin Throw event at the Asian Games.
— Team India at the Asian Games 🇮🇳 (@sportwalkmedia) October 3, 2023
🙌 𝐇𝐢𝐬𝐭𝐨𝐫𝐲 𝐫𝐞𝐰𝐫𝐢𝐭𝐭𝐞𝐧 𝐛𝐲 𝐭𝐡𝐞 𝐣𝐚𝐯𝐞𝐥𝐢𝐧 𝐪𝐮𝐞𝐞𝐧!
➡️ Follow @sportwalkmedia for schedule,… pic.twitter.com/2kWqbOofdN
अॅथलेटिक्समध्ये आज महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात पारुल चौधरीने रौप्य आणि प्रिती लांबाने कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकात भर घातली. पारूलने ९ मिनिटे २७.६३ सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. मंगळवारी पीटी उषाचा ३९ वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडणाऱ्या विथ्या रामराजने ४०० मीटर हर्डलमध्ये आज ५५.६८ सेकंदाची वेळ नोंदवरून कांस्यपद नावावर केले. त्यानंतर पुरुषांच्या ८०० मीटर शर्यतीत मोहम्मद अफसलने १ मिनिट ४८.४३ सेकंदच्या वेळेसोबत रौप्यपदक जिंकले. तिहेरी उडीत प्रविणने कांस्यपदक, बॉक्सिंगमध्ये ९२ किलो वजनी गटात नरेंदर बरवालने कांस्यपदक जिंकले.
THE THROW THAT WON US GOLD
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) October 3, 2023
Well Done Annu Rani#AsianGamespic.twitter.com/mW1DUgtSIP